*कोंकण Express*
*विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेत वाचन विकास उपक्रमांतर्गत साधना बालकुमार अंकाचे वितरण*
*कणकवली ः प्रतिनिधी*
विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेत मराठी विभागामार्फत दरवर्षी बालकांच्या वाचन शक्तीला प्रेरणा देण्यासाठी बालसाहित्यातील निवडक दिवाळी अंक खास विद्यार्थासाठी मागवून घेऊन त्यांना मोफत वाचन साहित्य वितरित केले जाते या वर्षी साप्ताहिक साधना मासिकाचा बालकुमार साधना दिवाळी प्रशालेतील विद्यार्थ्यांना वाटण्यात आला . बालकुमार साधना दिवाळी अंक विशेष वाचक अंक म्हणून प्रकाशित केला जातो . प्रदीर्घ वर्षाची पंरपरा जपणारा वाचन संस्कृती जोपासणारा बालकुमार मासिक साधना संस्थेने खास कुमारांसाठी तयार केले आहे विविध विषयांचे महत्व कथन करणारा अंक मान्यवर तज्ञांकडून विशेष मांडणी करून लेखन केलेले आहे प्रशालेत वाचन विकास साधण्यासाठी मुख्याध्यापक श्री पी जे कांबळे सरांनी वाचनाची मोहिम राबवून विद्यार्थांना दर्जेदार वाचन साहित्य दिल्यावर विद्यार्थी निश्चितच वाचनाकडे वळतील आणि वाचनाची अभिरूची वाढेल यासाठी ऋग्वेद बालवाचक दिवाळी अंक . किशोर दिवाळी अंक साधना दिवाळी अंक यांचे वितरण करून कसे वाचावे आणि आकलन करावे या विषयी मार्गदर्शन करण्यात आले यावेळी पर्यवेक्षिका सौ वृषाली जाधव जेष्ठ शिक्षक अच्यूतराव वणवे श्री संदिप कदम सौ नेहा सावंत उपस्थित होते.