उमेदवारी यादी जाहीर होताच भाजपमधील नाराजांचा जत्था उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर; घडामोडींना वेग*

उमेदवारी यादी जाहीर होताच भाजपमधील नाराजांचा जत्था उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर; घडामोडींना वेग*

*कोंकण Express*

*उमेदवारी यादी जाहीर होताच भाजपमधील नाराजांचा जत्था उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर; घडामोडींना वेग*

*मुंबई-*

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने रविवारी ९९ उमेदवारांची पहिलीयादी प्रसिद्ध केली होती.

ही यादी पाहून भाजपच्या काही नेत्यांचा जीव भांड्यात पडला तर यादीत नाव नसलेल्या नेत्यांची धाकधूक वाढली आहे. त्यामुळे पहिल्या यादीत नाव नसलेल्या भाजपच्या अनेक नेत्यांनी सोमवारी सकाळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सागर बंगला गाठला. त्यामुळे आज सकाळपासून फडणवीसांच्या सागर बंगल्यावर भाजपमधील नाराजांची ये-जा सुरु आहे.

यामध्ये पुण्यातील खडकवासला मतदारसंघाचे विद्यमान आमदार भीमराव तापकीर यांचा समावेश आहे. ते सकाळीच देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला पोहोचले होते.

मावळचे आमदार सुनील शेळके यांच्याविरोधातील भाजपचे इच्छुक बाळा भेगडे हेदेखील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला पोहोचले आहेत. त्यामुळे मावळच्या उमेदवारीवरुन जोरदार रस्सीखेच सुरु असल्याचे चित्र आहे.

अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत शेवटच्या क्षणी पक्षादेशामुळे माघार घ्यायला लागलेचे मुरजी पटेल हेदेखील आज सकाळी फडणवीसांना भेटण्यासाठी सागर बंगल्यावर दाखल झाले.

मुरजी पटेल हे अंधेरी पूर्वमधून निवडणूक लढण्यास इच्छूक आहेत. मात्र, भाजपच्या रविवारी जाहीर झालेल्या मुंबईतील उमेदवारांच्या यादीत मुरजी पटेल यांचा समावेश नव्हता. त्यामुळे मुरजी पटेल यांच्या समर्थकांच्या गोटात अस्वस्थतेचे वातावरण आहे.

या पार्श्वभूमीवर आता मुरजी पटेल फडणवीसांशी काय बोलणार आणि यामधून काय तोडगा निघणार, हे पाहावे लागेल.

तसेच वर्सोवा विधानसभा मतदारसंघाच्या विद्यमान आमदार भारती लव्हेकर यांचेही भाजपच्या पहिल्या उमेदवारी यादीत नाव नव्हते. खराब कामगिरीमुळे त्यांचा पत्ता कट होणार, असल्याची चर्चा आहे. त्यांच्याऐवजी संजय पांडे यांना संधी मिळेल, असा अंदाज आहे. मुंबईतील भाजपच्या 14 जागा जाहीर झाल्या आहेत. मात्र वर्सोवा मतदारसंघ वेट ॲंड वॉचवर ठेवण्यात आलेला आहे.

त्यामुळे वर्सोवाच्या आमदार भारती लव्हेकर देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला पोहोचल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!