*कोकण Express*
*शेर्लेत बांदा – मडुरा एसटी रुतली…*
*बांदा ः प्रतिनिधी*
पोटकालव्यासाठी रस्त्यालगत केलेल्या खोदाईत बांदा – मडूरा ही एसटी रुतल्याने कलंडली. यामुळे बसमधील प्रवाशांमध्ये एकच घबराट पसरली. मडूरा हायस्कूलमध्ये जाणार्या विद्यार्थ्यांसाठी चालक कास रस्त्याच्या बाजूने एसटी परतत असताना हा अपघात झाला. ठेकेदाराच्या दुर्लक्षामुळे हा अपघात झाल्याचा आरोप माजी तंटामुक्त समिती अध्यक्ष महादेव धुरी यांनी केला. स्थानिकांच्या मदतीने एसटीतील प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. अपघातात कोणीही जखमी झालेले नाही. हा अपघात शेर्ले केंद्रशाळेलगत आज सकाळी १० वाजण्याच्या सुमारास घडला.