*कोंकण Express*
*आ. नितेश राणे यांनी पूर्व इतिहास समजून घेऊनच टीका करण्याचे धाडस करावे…*
*अन्यथा पूर्व इतिहास बाहेर काढावा लागेल; आमही शिवसेना सोडली तरी बाळासाहेबांचेच शिवसैनिक राहिलोः माजी आ. परशुराम उपरकर यांचा आ. नितेश राणेंना इशारा..*
*कणकवली ः प्रतिनिधी*
आमदार नितेश राणे यांनी पूर्व इतिहास समजून घेऊनच टीका करण्याचे धाडस करावे. मी राणेंना सोडून गेलो असा उल्लेख करणाऱ्या नितेश राणे यांनी त्यावेळी राजकारण समजण्याएवढे आपले वय तरी होते का? हे प्रथम पहावे अशी टीका माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केली आहे.
मी बाळासाहेब ठाकरे यांचा एकनिष्ठ शिवसैनिक म्हणून कायमच होतो. मात्र आमदार राणे यांचे वडील नारायण राणे यांची शिवसेनेतून हाकालपट्टी करण्यात आली होती. नंतरच्या कालावधीत मी शिवसेना सोडली असली तरीही मी बाळासाहेब ठाकरे यांचाच शिवसैनिक म्हणून कायमच राहिलो.