*कोकण Express*
*शिवसेनेचा सावंतवाडी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन*
*खासदारांचा पुतळा जाळणाऱ्या नगराध्यक्षांसह भाजप पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करा…*
*२४ तासांच्या आत प्रक्रिया पूर्ण करण्याची मागणी…*
*सावंतवाडी ः प्रतिनिधी*
खासदार विनायक राऊत यांचा पुतळा जाळणाऱ्या नगराध्यक्षांसह भाजप पदाधिकारी-कार्यकर्त्यावर तात्काळ गुन्हे दाखल कर,या मागणीसाठी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून सावंतवाडी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या मांडला आहे.दरम्यान २४ तासांच्या आत गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण करा,अन्यथा आम्ही या ठिकाणाहून हटणार नाही,असा इशारा त्यांनी पोलिस निरीक्षक शशिकांत खोत यांना दिला आहे.