*कोंकण Express*
*प्रा. डॉ. बालाजी सुरवसे यांची कोकण विभागीय माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सदस्य पदी निवड*
*फोंडाघाट ः प्रतिनिधी*
येथील कला आणि वाणिज्य महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभागप्रमुख प्रा. डॉ. बालाजी सुरवसे यांची महाराष्ट्र शासनाच्या कोकण विभागीय माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सदस्य पदी निवड झाल्याबद्दल फोंडाघाट एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन श्री. महेश सावंत, सचिव श्री. चंद्रशेखर लिंग्रस, खजिनदार श्री. विठोबा तायशेटे संस्थेचे सर्व संचालक, सीडीसी चे सर्व सदस्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पुरंधर नारे, महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी व ग्रामस्थ यांचेकडून अभिनंदन करण्यात येत आहे.
प्रा. डॉ. बालाजी सुरवसे हे मुंबई विद्यापीठाच्या अर्थशास्त्र अभ्यास मंडळाचे सदस्य व अर्थशास्त्र विषयाचे पीएच. डी. चे गाईड आहेत. डॉ. सुरवसे यांच्या मार्गदर्शनाखाली दोन विद्यार्थ्यांनी पीएच. डी. पूर्ण केली असून सद्या चार विद्यार्थी पीएच. डी. करत आहेत. डॉ. सुरवसे यांनी यापूर्वी भारत सरकारच्या सातव्या राष्ट्रीय आर्थिक गणना समितीचे सदस्य, राष्ट्रीय मराठी अर्थशास्त्र परिषदेचे कार्यकारणीचे सदस्य, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अर्थशास्त्र अभ्यास मंडळाचे सदस्य, कोकण विभागीय माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे सदस्य, कोकण अर्थशास्त्र परिषदेचे संस्थापक सचिव तसेच केंद्र व राज्य सरकारच्या तसेच मुंबई विद्यापीठाच्या विविध समित्यावर अध्यक्ष व सदस्य म्हणून उल्लेखनीय कार्य केले आहे.