अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या नुकसान झालेल्या भात शेतीची त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी

अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या नुकसान झालेल्या भात शेतीची त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी

*कोंकण Express*

*अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या नुकसान झालेल्या भात शेतीची त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी*

*आमदार नितेश राणे यांनी जिल्हाधिकारी अनिल पाटील यांना दिले निवेदन*

*कणकवली ः प्रतिनिधी*

गेल्या पंधरा दिवसांपासून सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये दररोज मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस पडत असून कोकणातील खरीप हंगामातील मुख्य पीक असलेली भातशेती सद्या कापणीच्या स्थितीत आलेली आहे आणि दररोज कोसळणाऱ्या मुसळधार पाऊसामुळे भात शेतीचे कुजून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकरी हवालदिल झाला असून हाता तोंडाशी आलेला घास अतिवृष्टीने वाहून गेल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांसमोर उदरनिर्वाह कसा करावा हा प्रश्न निर्माण झाला आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये झालेल्या भातशेतीच्या नुकसानी बाबत कृषी विभागाकडून त्वरित पंचनामे तयार करून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावे असे निवेदन आमदार नितेश राणे यांनी जिल्हाधिकारी अनिल पाटील यांना निवेदन दिले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!