*कोकण Express*
*पत्रादेवी येथे कंटेनर पलटी होऊन अपघात…*
*बांदा ः प्रतिनिधी*
रस्त्याचा अंदाज न आल्यामुळे पत्रादेवी येथे कंटेनर पलटी झाला. ही घटना आज सकाळी मुंबई-गोवा महामार्ग घडली. संबंधित कंटेनर गोवा येथून मुंबईकडे केबलची वाहतूक करत होता. यावेळी हा अपघात घडला.
महामार्ग ठेकेदाराने कामाच्या ठिकाणी कोणतेही दिशादर्शक फलक न लावल्याने हा अपघात झाला. अपघातात सुदैवाने चालक व क्लिनर बचावलेत. कंटेनरचे मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पेडणे (गोवा) पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा करण्याचे काम सुरू आहे.