*कोंकण Express*
*माजी विद्यार्थी श्री गोविंद राजाराम शिरसाठ यांच्या कडून विद्यामंदिर प्रशालेला कपाटाची देणगी*
*कणकवली ः प्रतिनिधी*
१९६८ साली विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेत मॅट्रीकच्या वर्गात शिक्षण घेऊन उच्च पदस्थ झालेले माजी विद्यार्थी श्री गोविंद राजाराम शिरसाठ साहेब हे नागवे गावचे सुपूत्र मुंबई मध्ये राहूनही आपल्या मायभूमीची जन्मभूमीची नाळ आयुष्यभर तोडली नाही विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेच्या भौतिक गरजा ओळखून विज्ञान प्रयोग शाळेसाठी अकरा हजार रुपयाचे भक्कम लोखंडी कपाट शाळेला भेट देवून उपकृत केले शाळेचा विज्ञान विभाग सुसज्ज आहे विज्ञान विभाग प्रमुख पृथ्वीराज बर्डे सर प्रशाळेचा विज्ञान विभाग कौशल्याने सांभाळत आहेत आज प्रशालेत सेमी माध्यम व मराठी माध्यम विज्ञान विषयाचे अध्यापन केले जाते सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रशालेचा विज्ञान विभाग लौकीक प्राप्त आहे श्री शेळके सर सौ केळुसकर मॅडम सौ तेली मॅडम हे अध्यापक विज्ञान विषयाचे अध्यापन करत आहेत विज्ञान प्रयोग प्रदर्शन या स्पर्धेत तालुका जिल्हा राज्य विभागास प्रशालेचे विज्ञान प्रयोग यशस्वी झालेले आहे प्रशालेत सुसज्ज प्रयोग शाळा निर्माण करण्यासाठी प्रयोगशाळा सहाय्यक श्री राजेंद्र तवटे सतत धडपडत असतात त्यांच्याच प्रयत्नातून माजी विद्यार्थी श्री गोविंद शिरसाठ साहेब नागवे गावचे सुपुत्र यांनी प्रशालेला भरघोष देणगी देवून प्रयोग शाळेचे सोंदर्य ज्ञानमय केले . शिक्षण प्रसारक मंडळचे अध्यक्ष मा तवटे साहेब चेअरमन डॉ सौ . साळुंखे मॅडम सचिव मा. वळंजू साहेब संस्था पदाधिकारी मुख्याध्यापक श्री पिराजी कांबळे सर पर्यवेक्षिका सौ वृषाली जाधव शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले .

