कणकवली – पटवर्धन चौकात दंगल नियंत्रक पथकाच्या दोन तुकड्या तैनात

कणकवली – पटवर्धन चौकात दंगल नियंत्रक पथकाच्या दोन तुकड्या तैनात

*कोकण Express*

*कणकवली – पटवर्धन चौकात दंगल नियंत्रक पथकाच्या दोन तुकड्या तैनात…..*

*निलेश राणे व विनायक राऊत यांच्यातील राजकीय वाद टोकाला गेल्याने पोलीस प्रशासनाकडून दक्षता….!*

*कणकवली ः प्रतिनिधी*

गेले काही दिवस माजी खासदार निलेश राणे व खासदार विनायक राऊत यांच्यातील राजकीय वाद आता टोकाला गेला आहे. एकमेकांवर टोकाचे आरोप-प्रत्यारोप केल्यानंतर भाजपा कार्यकर्त्यांनी माजी खासदार निलेश राणे यांच्या समर्थनार्थ विनायक राऊत यांचा पुतळा जाण्यापासून ते अनेक इशारे दिल्याने जिल्ह्यातील वातावरण तापले आहे. त्या​​तच शिवसेनेकडूनही राणे यांना प्रत्युत्तरादाखल निर्वाणीचा इशारा देण्यात आल्यामुळे जिल्ह्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये या दृष्टीने पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे. दोन्ही बाजूने एकमेकांना फटके घालण्याची भाषा झाल्याने पोलिसांनी सतर्क राहण्याची भूमिका घेतली आहे. त्यादृष्टीनेच कणकवलीत दंगल नियंत्रक पथकाच्या दोन तुकड्या कणकवली पटवर्धन चौकात तैनात ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे येत्या काळात हा वाद काय वळण घेणार याकडे जिल्हा वासियांचे लक्ष लागून राहिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!