महायुती सरकारकडून बांधकाम कामगार बांधवांना मिळणार दिवाळी “गिफ्ट”

महायुती सरकारकडून बांधकाम कामगार बांधवांना मिळणार दिवाळी “गिफ्ट”

*कोंकण Express*

*महायुती सरकारकडून बांधकाम कामगार बांधवांना मिळणार दिवाळी “गिफ्ट”*

*मंत्रिमंडळ बैठकीत कामगार बांधवांची दिवाळी “गोड” करण्याचा झाला ऐतिहासिक निर्णय*

*शिवसेना बांधकाम कामगार सेनेकडून सरकारच्या निर्णयाचं स्वागत*

राज्यातील महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदीत नोंदणी सक्रिय जीवित असलेल्या बांधकाम कामगारांना प्रत्येकी ५ हजार रुपयाचे सानुग्रह अनुदान अर्थसहाय्य “दिवाळी भेट” देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला असून लवकरच कामगारांच्या बँक खात्यावर अर्थसहाय्य रक्कम जमा करण्याची कार्यवाही चालू केल्याची माहिती राज्याचे कामगार मंत्री श्री.सुरेश खाडे यांनी जाहीर करत कष्टकरी कामगारांची दिवाळी गोड करण्याची घोषणा केली आहे. राज्यभरात असे सुमारे २८ लाखाहून अधिक कामगार असून त्यांना शासनाच्या या अर्थसहाय्य अनुदान योजनेचा लाभ मिळणार असून महायुती सरकारच्या या ऐतिहासिक निर्णयाचे शिवसेना बांधकाम कामगार सेना स्वागत करत आहे. शेतकऱ्यांना कृषी सन्मान मानधन योजनेमधून तिमाही 2 हजार रुपये, लाडक्या बहिणींना दर महिना 1500 रुपये ओवाळणी, जेष्ठ नागरिकांना वयश्री योजनेंतर्गत 3 हजार रुपये बँक खात्यावर थेट लाभ, महिला सन्मान योजनेंतर्गत महिलांना 50% सवलतीच्या दरात एसटी प्रवास अशा लोकपयोगी योजना राबवून महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी महायुती सरकार खऱ्या अर्थाने गोरगरिबांसाठी भरीव काम करत असल्याचे सिद्ध केले आहे.तर बांधकाम कामगारांना सुरक्षा साहित्य संच, संसारपयोगी भांडी संच वितरीत करून असंघटित कामगार वर्गाचा सन्मान केला आहे.कामगारांच्या पाल्यांचे शैक्षणिक सहाय्य व इतर सुविधा योजनांचे प्रलंबित अर्ज मंजुरीसाठी सिंधुदुर्ग जिल्हा बांधकाम कामगार कृती समितीच्या वतीने कामगार मंत्र्यांची भेट घेऊन लक्ष वेधले असून लवकरच कामगारांच्या खात्यावर अनुदान जमा करण्याचे आदेश कामगार कल्याण मंडळाच्या सचिवांना दिल्याची माहिती जिल्हाध्यक्ष प्रसाद गावडे यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!