*कोकण Express*
*राष्ट्रवादीच्या शहर अध्यक्षपदी देवा टेमकर, तर पदवीधर संघ तालुकाध्यक्षपदी प्रसाद दळवी यांची नियुक्ती..*
*माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले व जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या उपस्थितीत निवड प्रक्रिया पुर्ण..*
*सावंतवाडी ः प्रतिनिधी*
राष्ट्रवादीच्या शहर अध्यक्षपदी माजी नगरसेवक देवा टेमकर, तर पदवीधर संघ सावंतवाडी तालुकाध्यक्षपदी प्रसाद दळवी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले आणि जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या उपस्थितीत ही निवड प्रक्रिया पार पडली. यावेळी राजू धारपवार यांच्या नेतृत्वाखाली खासकिलवाडा येथील युवकांनी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला.