*कोंकण Express*
*मालवण तालुका स्तरीय मैदानी स्पर्धेत त्रिमूर्ती माध्यमिक विद्यालय शिरवंडेचे वर्चस्व*
मालवण तालुकास्तरीय मैदानी स्पर्धा सोमवार दिनांक ७/१०/२४ वदिनांक८/१०/२४ रोजी त्रिमूर्ती विकास मंडळ मुंबई संचलित त्रिमूर्ती माध्यमिक विद्यालय शिरवंडे च्या भव्य पटांगणावर संपन्न झाल्या. या स्पर्धेमध्ये त्रिमूर्ती माध्यमिक विद्यालय शिरवंडेच्या वीस स्पर्धकांनी सहभाग घेतलेला होता .या स्पर्धेचे उद्घाटन कोकण शिक्षक मतदार संघाचे आमदार सन्माननीय श्री ज्ञानेश्वर म्हात्रे सर यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या स्पर्धेमध्ये त्रिमूर्ती माध्यमिक विद्यालयाच्या एकूण 14 स्पर्धकांनी उज्वल यश प्राप्त केले आहे. यामध्ये सानिका दीपक गावकर हिने गोळा फेक मध्ये प्रथम, वैष्णवी रमेश शेळके हिने लांब उडी प्रथम ,संचिता घाडीगावकर हिने 3000 मीटर धावणे मध्ये प्रथम, हर्षिता कासले हिने उंचवडी प्रथम व हर्डल्स 100 मीटर मध्ये तृतीय रुतिका बबन शिंदे हिने उंच उडी तृतीय ,सपना लाड हिने पंधराशे मीटर तृतीय ,चैतन्य गावकर याने 200 मीटर धावणे द्वितीय क्रमांक 400 मीटर रिले प्रथम क्रमांक 100 मीटर रिले प्रथम क्रमांक, श्रेयस चव्हाण याने 600 मीटर धावणे प्रथम कुमार 100 मीटर हर्डल्स द्वितीय क्रमांक ,उंच उडी द्वितीय क्रमांक किरण रामचंद्र शेळके यांनी उंच उडी प्रथम, क्रमांक आदित्य कृष्णा घाडीगावकर भालाफेक तृतीय क्रमांक सर्वेश घाडीगावकर लांब उडी प्रथम क्रमांक पंधराशे मीटर धावणे तृतीय क्रमांक उंच उडी तृतीय क्रमांक चिंतामणी प्रकाश कासले 3000 मीटर धावणे द्वितीय क्रमांक 100 मीटर रिले प्रथम क्रमांक सुजल सत्यवान कासले 400 मीटर हर्डल्स द्वितीय क्रमांक 400 मीटर रिले प्रथम क्रमांक 100 मीटर रिले प्रथम क्रमांक अविष्कार केदु शेळके पंधराशे मीटर धावणे द्वितीय क्रमांक १०० मीटर हर्डल्स द्वितीय क्रमांक 400 मीटर रिले प्रथम क्रमांक 100 मीटर रिले प्रथम क्रमांक असे उज्वल यश मालवण तालुकास्तरीय स्पर्धेमध्ये शिरवंडे हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. या यशाबद्दल संस्था अध्यक्ष श्री बाबू बाणे, उपाध्यक्ष श्री अच्युत भावे सरचिटणीस श्री तुषार राऊत सर्व पदाधिकारी,शालेय समिती अध्यक्ष श्री सर्व देव सहदेव चव्हाण मुख्याध्यापक तथा सिंधुदुर्ग जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष श्री वामन तर्फे,शालेय समिती सदस्य श्री चंद्रकांत गावकर श्री दशरथ घाडीगावकर श्री कैलास घाडीगांवकर,सर्व शिक्षक शिक्षकेतर, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, शिक्षक पालक संघ सदस्य यांनी सर्व यशस्वी विद्यार्थी व प्रशिक्षक श्री सुभाष सावंत सर यांचे विशेष अभिनंदन केले व एकूण विद्यार्थ्यांपैकी 11 विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या .किर्लोस गावचे सुपुत्र क्रीडा प्रशिक्षक श्री बाळकृष्ण कदम सर यांचेही या स्पर्धकांना मार्गदर्शन लाभले त्यांनाही धन्यवाद.