*कोंकण Express*
*क्रीडा क्षेत्रात विशेष कष्ट घेऊन भविष्यात देशासाठी सुवर्ण पदक मिळवून द्या -मा.आ.श्री.ज्ञानेश्वर म्हात्रे*
*मालवण तालुका स्तरीय मैदानी स्पर्धेचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सर यांच्या हस्ते भव्यदिव्य उद्घाटन*
त्रिमूर्ती विकास मंडळ मुंबई संचलित त्रिमूर्ती माध्यमिक विद्यालय शिरवंडेच्या भव्य मैदानावर मालवण तालुका स्तरीय मैदानी स्पर्धा सोमवार दिनांक ७/१०/२४ व मंगळावर दिनांक ८/१०/२४रोजी उत्साहात संपन्न झाल्या.या स्पर्धेचे उद्घाटन कोकण शिक्षक विभाग मतदार संघाचे कार्यसम्राट आमदार मा.श्री.ज्ञानेश्वर म्हात्रे सर यांच्या शुभहस्ते करण्यात आले.कोकण शिक्षक मतदार संघाचे आमदार श्री म्हात्रे सर हे दोन दिवस सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर होते.या दरम्यान त्रिमूर्ती माध्यमिक विद्यालय शिरवंडे येथे तालुका स्तरीय मैदानी स्पर्धा संपन्न होत असल्याची माहिती सिंधुदुर्ग जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष तथा त्रिमूर्ती माध्यमिक विद्यालय शिरवंडेचे मुख्याध्यापक श्री.वामन तर्फे यांनी आमदार महोदयांना दिली आणि या स्पर्धेचे आपण उद्घाटन करावे अशी विनंती केली.त्यांच्या विनंतीला मान देऊन आमदारांनी उद्घाटन करण्याची तयारी दर्शवली आणि शाळेला भेट देत आपल्या व्यस्त कार्यक्रमातून स्पर्धेचे उद्घाटन केले.यावेळी खेळाडूंना प्रोत्साहन देऊन मार्गदर्शन करताना क्रीडा क्षेत्रात विशेष कष्ट घेऊन भविष्यात देशासाठी सुवर्ण पदक मिळवून द्या असे आवाहन केले.यावेळी व्यासपीठावर शालेय समिती अध्यक्ष श्री.सहदेव चव्हाण,सिंधुदुर्ग जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष तथा त्रिमूर्ती माध्यमिक विद्यालय शिरवंडेचे मुख्याध्यापक श्री वामन तर्फे, मुख्याध्यापक संघाचे सचिव श्री गुरुदास कुसगांवकर, उपाध्यक्ष श्री.हनुमंत वाळके, सिंधुदुर्ग जिल्हा अध्यापक संघाचे अध्यक्ष तथा तालुका क्रीडा समन्वयक श्री.अजय शिंदे, शिक्षक सेनेचे अध्यक्ष श्री.कमलेश गोसावी, शालेय समिती सदस्य श्री.दशरथ घाडीगांवकर, श्री.चंद्रकांत गांवकर, श्री.कैलास घाडीगांवकर,क्रिडा प्रशिक्षक श्री.सुभाष सावंत, श्री.दिनेश सावंत, शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष श्री प्रकाश कासले, शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष श्री रविंद्र गांवकर, उपस्थित होते.या वेळी सन्माननीय श्री.म्हात्रे सर यांचा संस्था व शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला.तसेच श्री गुरुदास कुसगांवकर, श्री.वाळके सर, श्री.अजय शिंदे सर यांचाही सत्कार करण्यात आला.आज पर्यंत आपल्या २५वर्षांच्या कालखंडात आमदारांनी अशा सृपर्धेचे उद्घाटन केलेले नाही त्यामुळे हा उद्घाटन सोहळा ऐतिहासिक असल्याचे मत क्रीडा समन्वयक श्री अजय शिंदे यांनी
व्यक्त करत आमदारांना आणि मुख्याध्यापक श्री.वामन तर्फे सर यांना
धन्यवाद दिले.या वेळी जिल्हा वार्षिक योजना अंतर्गत प्राप्त श्री.ज्ञानेश्वर म्हात्रे सर यांच्या निधीतून सोलर हायब्रिड इन्व्हर्टर शालेय समिती अध्यक्ष श्री.सहदेव यांच्याकडे सुपूर्द केला.या मैदानी स्पर्धेत मालवण तालुक्यातील २५शाळांतील एकूण ४७५मुलांनी सहभाग घेतला.स्पर्धा यशस्वी होण्यासाठीशाले समिती अध्यक्ष श्री.सहदेव चव्हाण, सर्व सदस्य, शिक्षक पालक संघ सदस्य, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य,शाळेचे मुख्याध्यापक श्री वामन तर्फे, तालुका समन्वयक श्री अजय शिंदे,शाळेचे क्रीडा श्री.सुभाष सावंत सर, तालुक्यातील सर्व क्रिडा शिक्षक, प्रशालेचे सहाय्य शिक्षक श्री.काणेकर सर, श्री.धाडगा सर, श्रीमती धुरी मॅडम, लिपिक श्री.कैलास घाडीगांवकर कर्मचारी श्री.शामसुंदर गांवकर, श्री.जानू शिंदे , सर्व विद्यार्थी यांनी विशेष परिश्रम घेतले.तसेच क्रीडाप्रेमी आणि वसई पुर्व शिवसेना शहरप्रमुख,शिरवंडेचे सुपुत्र श्री.शरद गांवकर यांनी आपल्या मातोश्री कै.सुलोचना अनंत गांवकर यांच्या स्मरणार्थ सर्व विद्यार्थी आणि उपस्थित शिक्षक व इतर उपस्थित यांना दोन दिवसांच्या नाष्टयाची व्यवस्था केली. पंच म्हणून श्री महेंद्र वारंग, श्रीनाथ फणसेकर, दिनेश सावंत ,संजय पेंडुरकर ,शैलेश मुळीक, समीर गोसावी, पंकज राणे ,श्रीराम गावकर रवी घेवडे ,संदीप कोळापटे ए आय वसावे, कमलेश गोसावी ,संतोष तावडे ,निलेश राठोड, रुपेश खोबरेकर प्रवीण पारकर ,अनिल आचरेकर संतोष गोसावी ,किसन हडलगेकर लीना पुजारे,प्रवीण खोचरे यांनी काम पाहिले.दोन्ही दिवसांच्या स्पर्धा यशस्वीपणे पार पाडल्या बद्दल मुख्याध्यापक श्री वामन तर्फे आणि क्रीडा समन्वय श्री.अजय शिंदे यांनी सर्वांना धन्यवाद दिले आणि आभार मानले.