*कोंकण Express*
*सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोन्ही कॅबिनेट मंत्री यांनी राजीनामे द्यावेत असा सल्ला देण्यापेक्षा स्वतः चे आत्मपरीक्षण करा…….*
*शिवसेना जिल्हा संघटक श्री.रुपेश पावसकर यांचा माजी आमदार परशुराम उपरकर यांना निर्वाणीचा इशारा…….*
माजी आमदार परशुराम उपरकर यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना. रविंद्र चव्हाण,उद्योगमंत्री मा.ना.उदय सामंत यांच्यावर टीका करून प्रसिद्धी मिळविण्यापेक्षा स्वतः चे अस्तित्व कुठे आहे हे तपासावे मा.ना.उदय सामंत यांनी अनिकेत पटवर्धन यांनी कार्यक्रमाचे नियोजन सुलभ केले.आणि महत्वाचे म्हणजे सर्वांना विश्वासात घेऊन केले. उदयजी सामंत यांनी त्याच्याबद्दल गौरवोद्गार काढले.ज्याने चांगल काम केलं त्याची प्रशंसा करणे हे आपल्या हिंदू संस्कृतीचे प्रतीक आहे.हे माजी आमदार परशुराम उपरकर हे विसरले असू शकतात.असो वयोमानानुसार माणसांचे विचार भरकटतात.माजी आमदार परशुराम उपरकर हे ज्या पक्षात होते त्या पक्षातून त्यांची हकालपट्टी करण्यात आली.हे जनतेला न्यात आहे.त्यामुळे मा.मंत्री महोदय यांना राजीनामा देऊन श्री.अनिकेत पटवर्धन यांना मंत्री करा असा सल्ला देण्यापेक्षा स्वतः आमदारकीची निवडणूक लढवून आपण खराखुरा जनतेतील लोकप्रतिनिधी होऊ शकतो हे सिद्ध करावे.दुसऱ्यावर आरोप करताना स्वतः किती धुतल्या तांदळासारखे आहोत याचे आत्मपरीक्षण करावे.