*कोंकण Express*
*आडेली वेंगुर्ला येथे १३ रोजी एकपात्री अभिनय स्पर्धा*
*तळेरे ः प्रतिनिधी*
श्री सोमेश्वर कलामंच सामाजिक संस्था ‘गराजलो रे गराजलो’ आयोजित नवोदित होतकरू कलाकार घडावा या उदात्त हेतूने रविवार १३ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वा. कृषिरत्न काकासाहेब चमणकर हायस्कूल आडेली वेंगुर्ला येथे एकपात्री अभिनय स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. कलाकारांनी या स्पर्धेत सहभाग घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
खुल्या गटांमध्ये ही स्पर्धा होणार असून सादर करण्याचा विषय सामाजिक राहील. सादर करण्याचा कालावधी ४ ते ७ मिनिटांचा राहील. या स्पर्धेचा निकाल ताबडतोब जाहीर करून पारितोषिक वितरण करण्यात येईल. स्पर्धेत तीन क्रमांक काढण्यात येतील. प्रथम, द्वितीय, तृतीय विजेत्यांना सन्मानचिन्ह, सन्मानपत्र आणि रोख रक्कम देण्यात येईल. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व स्पर्धकांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात येईल. लवकरच नोंदणी करा, असे आवाहन संस्थेमार्फत करण्यात आले आहे. अधिक माहिती आणि नाव नोंदणीसाठी श्री सहदेव धर्णे : ९७०२०८७९३३ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.