आमदार नितेश राणे यांनी बिडवाडी विभागात उबाठा सेनेला पाडले खिंडार*

आमदार नितेश राणे यांनी बिडवाडी विभागात उबाठा सेनेला पाडले खिंडार*

*कोंकण Express*

*आमदार नितेश राणे यांनी बिडवाडी विभागात उबाठा सेनेला पाडले खिंडार*

*युवासेना उपविभाग प्रमुख,श्रीकृष्ण (बाबू) घाडीगांवकर सह असंख्य कार्यकर्त्यांनी केला भाजप प्रवेश*

*माईन गावी झाला भाजपमध्ये जाहीर पक्षप्रवेश*

*कणकवली ः प्रतिनिधी*

कणकवली तालुक्यातील माईन येथील सामाजिक कार्यकर्ता, बिडवाडी युवासेना जि. प. उपविभागीय प्रमुख,श्रीकृष्ण (बाबू) घाडीगांवकर व माईन येथील असंख्य ग्रामस्थांनी भारतीय जनता पार्टीत पक्षप्रवेश केला भाजपचे प्रवक्ते आणि कणकवली देवगड वैभववाडी चे आमदार नितेश राणे यांनी माईन नेते या सर्व कार्यकर्त्यांची प्रत्यक्ष भेट घेत भाजपमध्ये स्वागत केले. माईन येथे हा जाहीर पक्ष प्रवेश झाला. या प्रवेशामुळे बिडवाडी भरणी, माईन या भागात उबाठा सेनेला फार मोठा धक्का बसला आहे.
यावेळी उबाठा सेनेतून भाजपात प्रवेश केलेल्या मध्ये शाखाप्रमुख संतोष गणपत पवार , कृष्णा अंकुश घाडी, धोंडू शांताराम घाडी, संदीप चंद्रकांत घाडी, मनोहर घाडी, सुनील घाडी, पंकज राणे, जयराम आडेलकर, दत्ताराम देवणे, दिपाली देवणे, सचिन बाणे, ज्ञानदेव दळवी, नीता दळवी, मनस्वी गाडी, महेश घाडी, कमल घाडी, शुभांगी घाडीगावकर, चंद्रभागा घाडीगावकर, आरती घाडीगावकर, सुमित्रा आडेलकर, सुप्रिया पवार, सुरेश पवार, पालवी राणे, जोशना आडेलकर , वनिता राणे, वासंती घाडीगावकर अशा उबाठा सेनेच्या कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला.
या प्रवेशावेळी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी तालुका अध्यक्ष मिलिंद मेस्त्री,युवक जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री, राजू हीर्लेकर, संदीप सावंत,हेमंत देसाई, आदी भाजप पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!