*कोंकण Express*
*भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांची वेंगुर्ला तालुक्यातील विविध नवरात्र मंडळांना भेट*
*महिला सबलीकरण आणि तरुणांच्या रोजगारासाठी पुढाकार*
*वेंगुर्ला ः प्रतिनिधी*
वेंगुर्ला तालुक्यातील नवरात्र उत्सवाचा उत्साह वाढवण्यासाठी भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांनी विविध देवी मंडळांना भेट दिली. *दुर्गा मातांचे आशीर्वाद घेत विशाल भाई परब यांनी सांगितले की, “नवरात्र उत्सव हा श्रद्धा आणि शक्तीचा महापर्व आहे. या काळात देवीचे आशीर्वाद घेऊन समाजातील महिलांचे सबलीकरण आणि तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी मी कटीबद्ध आहे.”*
विशालजी परब यांनी तालुक्यातील प्रत्येक मंडळाला भेट देऊन, त्यांनी देवीच्या नऊ दिवसांच्या पूजेला यश आणि सुख-समृद्धीची कामना केली. त्यांनी सांगितले की, *वेंगुर्ला तालुका हा विकासाच्या मार्गावर आहे आणि येथे मोठमोठे उद्योगधंदे आणून रोजगाराच्या संधी वाढवण्यासाठी ते सातत्याने काम करत आहेत. *”महिला सबलीकरण हा आपला प्राधान्य विषय असून तरुणांना योग्य संधी उपलब्ध करून देणे हे माझे ध्येय आहे,” असेही विशाल भाई परब म्हणाले.*
यावेळी भेट दिलेल्या मंडळांची नावे अशी आहेत:
मातोश्री कला क्रीडा मंडळ, दाबोली नाका, वेंगुर्ला कॅम्प कॉर्नर कला क्रीडा मंडळ, वेंगुर्ला, गाडी अड्डा मित्र मंडळ वेंगुर्ला,सातेरी देवी मंदिर देवस्थान, वेंगुर्ला,भराडी देवी मंदिर, वेंगुर्ला,शिवसेना कार्यालय, वेंगुर्ला,सिद्धेश्वर देवस्थान (सिद्धेश्वर वाडी) वेंगुर्ला,
नवलादेवी मंदिर मोचेमाड, (घाळकरवाडी),माऊली मंदिर, वरची केरवाडी,खालची केरवाडी, पूर्वी देवी मंदिर तळवडे,सातेरी देवी मंदिर तळवडे,जय भवानी मित्र मंडळ भोगवे,नवरात्रमंडळ, मोचेमाड, नवदुर्गा मंडळ, अणसुर,माऊलीमंदिर शिरोडा,
युवा मित्र मंडळ आरोंदा,गवळदेव प्रसन्न,खानोली.
*यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून श्री सुहास गवंढळकर (भाजपा तालुकाध्यक्ष वेंगुर्ला) ,श्री प्रणव वायंगणकर (युवा मोर्चा अध्यक्ष वेंगुर्ला) श्री दादा कुबल मा जि प सदस्य, श्री हेमंत गावडे (उपसरपंच परबवाडा) श्री कृष्णा धानजी (माजी शहर अध्यक्ष) श्री राहुल गावडे, श्री अमित गावडे, श्री सोमकांत सावंत, श्री प्रभाकर नाईक, श्री निलेश मांजरेकर, श्री अनंत रेडकर, श्री संतोष मयेकर, आदी मान्यवर उपस्थित होते..*