फोंडाघाट महाविद्यालयात हिंदी दिन संपन्न

फोंडाघाट महाविद्यालयात हिंदी दिन संपन्न

*कोंकण Express*

*फोंडाघाट महाविद्यालयात हिंदी दिन संपन्न.*

*फोंडाघाट ः प्रतिनिधी*

येथील कला आणि वाणिज्य महाविद्यालय फोंडाघाटमध्ये हिंदी दिन साजरा करण्यात आला. हिंदी विभागाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमासाठी डॉ. गीता कूनकवळेकर कणकवली कॉलेज कणकवली या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. त्यानी हिंदी भाषेचा लेखाजोखा मांडला. हिंदी भाषा ही देशाच्या स्वातंत्र्याची मुख्य क्रांतिकारी भाषा बनली होती. सर्व स्वातंत्र्यसैनिकांनी हिंदी भाषेच्या घोषवाक्याचा आधार घेऊन जनतेला प्रेरित केले. तुम मुझे खून दो मैं तुम्हे आजादी दूंगा, चले जाव, करेंगे या मरेंगे, इन्कलाब जिंदाबाद, असहयोग इत्यादी घोषणा स्वातंत्र्य लढ्याच्या केंद्रस्थानी बनल्या होत्या. हिंदी ही केवळ भाषा नसून भारतीयांचा आत्मा आहे. संस्काराची खान आहे व विचार संस्कृतीची विरासत आहे.हीच खरी हिंदी भाषेची ओळख आहे.

हिंदी भाषा ही जनतेच्या अस्मितेचे प्रतीक आहे. हिंदी दिवस केवळ भारतातच नाही तर संपूर्ण जगात साजरा केला जातो. प्रवासी भारतीय हिंदी भाषेतील गीत, संगीत, चित्रपट मोठ्या उत्सुकतेने पाहतात.

हिंदी जगतातील कबीर मध्ययुगीन काळात अंधविश्वास व पाखंडावर प्रहार करतात. वर्तमान काळातील संजीव विज्ञानाचे विद्यार्थी असून सुद्धा हिंदीमध्ये साहित्य निर्माण करतात.

हिंदी दिवसाचे औचित्य साधून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पुरंदर नारे यांनी विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या हिंदी मेरी शान या भितीपत्रकाचे उद्घाटन केले. ज्यामध्ये हिंदी भाषेचे महत्त्व कविता, अग्रलेख, किस्से, जोक्स इत्यादींचे लेखन केले आहे. प्राचार्य डॉ. पुरंदर नारे यांनी हिंदी भाषा ही जगातील दुसऱ्या क्रमांकाची भाषा आहे. भारतामध्ये सर्वात अधिक बोलली जाणारी भाषा म्हणजे हिंदी होय. हिंदी भाषा ही जगातील कित्येक विद्यापीठात शिकवली जाते. जगातील समृद्ध भाषेच्या इतिहासात हिंदीचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. हिंदी भाषा ही प्रेम, करुणा, दया, शांतीचे प्रतीक आहे. असे प्रतिपादन अध्यक्ष स्थानावरून डॉ. नारे यांनी केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हिंदी विभाग प्रमुख डॉ. संतोष रायबोले यांनी केले त्यांनी आपल्या वक्तव्यात हिंदी भाषा व हिंदी साहित्याची समीक्षात्मक मांडणी केली. कबीर, रहीम, निराला,नागार्जुन,बिहारी इत्यादी रचनाकारांचे हिंदी भाषेच्या समृद्धतेत मोलाचे योगदान आहे. हिंदी भाषा काश्मीरपासून ते कन्याकुमारी पर्यंत प्रत्येकाची बोली बनली आहे. एकूणच हिंदी भाषेचा जागर यावेळी करण्यात आला. या कार्यक्रमाला शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!