*कोंकण Express*
*आशिये सरपंच महेश गुरव यांचे काम सामाजिक बांधिलकी जपणारे – डॉ.गीता गवळी..*
*आशिये ग्रामपंचायत आयोजित नेत्र तपासणी शिबिरातील नागरिकांचे मोतीबिंदू शस्त्रक्रिया यशस्वी*
*कणकवली ः प्रतिनिधी*
आशिये गावातील शस्त्रक्रिया झालेल्या महिला वृद्ध महिला,नागरिकांनी आम्हा डॉक्टरांचे आभार मानण्यापेक्षा सरपंच महेश गुरव यांच्या आभार मानले पाहिजेत,कारण आशिये ग्रामपंचायत सरपंच महेश गुरव यांनी सामाजिक बांधिलकी जपणारे कार्य केले आहे. खरे ऋण मानायचे असतील तर गावचे सरपंच महेश गुरव यांचे व्यक्त करा,कारण त्यांनी आम्हाला आपली सेवा करण्याची संधी दिली आहे, असे मत लायन्स आय रुग्णालयाच्या डॉ.गीता दळवी यांनी व्यक्त केले.
आशिये ग्रामपंचायतच्या माध्यमातून गावातील गरजू , होतकरु व वयोवृध्द नागरिकांसाठी मोफत नेत्र तपासणी व चष्मा वाटप शिबिरातील नागरिकांचे मोतीबिंदू शस्त्रक्रिया लायन्स आय रुग्णालयात पूर्ण करण्यात आल्या. तसेच शिबिरातील ५२ जणांना चष्मा वाटप करण्यात आले.
यावेळी सरपंच महेश गुरव , उपसरपंच संदिप जाधव , ग्रामसेवक राकेश गोळवणकर,लायन्स आय रुग्णालयाचे डॉ. सिध्दार्थ कदम ,डॉ .तेंडुलकर,मनाली सावंत,दादा कोरडे ,आदी टीमने या शिबिरात तपासणी केली.
फोटो कॅप्शन – आशिये ग्रामपंचायतच्यावतीने मोफत मोतीबंदू शस्त्रक्रिया झालेल्या नागरीकांसमवेत सरपंच महेश गुरव , उपसरपंच संदिप जाधव , ग्रामसेवक राकेश गोळवणकर आदी.