मुंबई, दि. १० : महापालिकेनं कार्यालयातील बेकायदा बांधकामावर केलेली कारवाई अभिनेत्री कंगना राणावत हिच्या चांगली जिव्हारी लागली आहे. कंगनानं शिवसेना व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका सुरूच ठेवली आहे. आज पुन्हा एकदा ट्वीट करून तिनं उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. ‘माझ्या अनुपस्थितीत माझं घर तोडणाऱ्या गुंडांना महापालिकेचं नाव देऊ नका. राज्यघटनेचा इतका मोठा अपमान करू नका,’ असं कंगनानं म्हटलं आहे. ‘बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या विचारधारेवर शिवसेना उभी केली, ती विचारधारा विकून शिवसेना सत्तेसाठी ‘ सोनिया सेना’ झाली आहे, अशी टीका कंगनानं केली आहे.