त्रिमूर्ती माध्यमिक विद्यालय शिरवंडेच्या मुलांनी केली खाण कामगारांच्या घरी स्वच्छता

त्रिमूर्ती माध्यमिक विद्यालय शिरवंडेच्या मुलांनी केली खाण कामगारांच्या घरी स्वच्छता

*कोंकण Express*

*त्रिमूर्ती माध्यमिक विद्यालय शिरवंडेच्या मुलांनी केली खाण कामगारांच्या घरी स्वच्छता*

त्रिमूर्ती विकास मंडळ मुंबई संचलित त्रिमूर्ती माध्यमिक विद्यालय शिरवंडेच्या विद्यार्थ्यांनी गांधी जयंतीचे औचित्य साधून स्वच्छता पंधरावडा उपक्रमा निमित्त किर्लोस येथील खाण कामगारांच्या घरी जाऊन स्वच्छता केली आणि स्वच्छतेचे महत्त्व पटवून सांगितले.गांधी जयंती व लालबहादूर शास्त्री जयंती साजरी करण्यात आली.यावेळी विद्यार्थी आणि शिक्षकांनी महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या कार्याचा आढावा घेणारे विचार व्यक्त केले.गांधी जयंती व स्वच्छता पंधरावडा उपक्रम निमित्ताने चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. यावेळी शालेय परिसर, स्वच्छतागृह परिसरात स्वच्छता करण्यात आली.तसेच हायस्कूल ते किर्लोस खाण कामगार वस्ती पर्यंत स्वच्छता फेरी काढण्यात आली.स्वच्छता फेरीच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली.यावेळी मुख्याध्यापक श्री वामन तर्फे, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, सर्व विद्यार्थी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!