*कोंकण Express*
*माध्यमिक विद्यामंदिर कनेडी प्रशालेत करिअर मार्गदर्शन*
*कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई संचलित माध्यमिक विद्यामंदिर कनेडी, श्री. मोहनराव मुरारीराव सावंत ज्युनि. कॉलेज ऑफ आर्ट्स ॲण्ड काॅमर्स कनेडी, श्री. तुकाराम शिवराम सावंत ज्युनि. कॉलेज ऑफ सायन्स कनेडी आणि बालमंदिर कनेडी येथे वार- शुक्रवार, दिनांक- २७ सप्टेंबर २०२४ रोजी, प्रशालेत विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन करण्यात आले.*
*विद्यार्थ्यांना दहावी, बारावीनंतर भविष्यात उपलब्ध असलेल्या मर्चंट नेव्ही मध्ये नोकरीच्या संधी या संदर्भात करिअर मार्गदर्शन करण्यात आले.*
*या प्रसंगी कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक भिरवंडे गावचे सुपुत्र सन्मा.श्री.प्रथमेश सावंत, कामाक्षी कॉलेज ऑफ कलिनरी आर्ट्स, गोवा यांच्याकडून विशेष करिअर मार्गदर्शन विद्यार्थ्यांना करण्यात आले.भविष्यामध्ये मर्चंट नेव्ही चे क्षेत्र विस्तारत असल्याने नोकरीच्या खूप मोठ्या प्रमाणात संधी विदेशात अमेरिका, जर्मनी, फ्रान्स, कॅनडा या देशांमध्ये उपलब्ध होणार आहेत. त्यासाठी विद्यार्थ्यांनी योग्य वेळ योग्य निर्णय घेणे आवश्यक आहे. या कार्यक्रमासाठी प्रशालेचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य श्री. सुमंत दळवी, प्रशालेचे पर्यवेक्षक, क्रीडा शिक्षक श्री.बयाजी बुराण, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.*
*कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार श्री. कोरडे बी.डी. यांनी केले.*