*कोकण Express*
*भिरवंडे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सुजाता सावंत तर उपसरंपचपदी नितिन सावंत यांची बिनविरोध निवड….!*
*कणकवली ः प्रतिनिधी*
ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सुजाता सावंत आणि उपसरंपचपदी नितिन सावंत यांची आज बिनविरोध निवड झाली आहे. जिल्हा बँकेचे अध्यक्ष तथा शिवसेना नेते सतिश सावंत यांनी शिवसेना पक्षावतीने उमेदवारी जाहीर केली होती. आज सकाळी दोन्ही पदासाठी उमेदवारी नामर्निदेशन पत्र निवडणूक निर्णय अधिकारी श्री. राऊत यांना सादर करण्यात आले. त्यानंतर दुपारी दोन वाजता विषेश सभेत सरपंच आणि उपसरपंचपदासाठी बिनविरोध निवडी जाहीर करण्यात आल्या.
आज सकाळी भिरवंडे येथील ग्रामस्थांची बैठक झाली. यावेळी सतीश सावंत यांच्यासह पंचायत समितीचे सदस्य मंगेश सावंत, हेमंत सावंत, देवालय संचालक मंडळाचे सचिव गणपत सावंत,कनेडी गटशिक्षण प्रसारक मंडळ मुंबईचे सरचिटनिस सुरेश सावंत, भिरवंडेकर मराठा समाज मुंबईचे अध्यक्ष अजित सावंत, माजी सरपंच महादेव सावंत, भिरवंडे सोसायटीचे चेअरमन बेनी डिसोजा, विनय सावंत, संदिप सावंत आदी मान्यवर उपस्थितीत होते.

भिरवंडे ग्रामपंचायतीच्या सात पैकी चार जागा बिनविरोध होत्या तर तीन जागांसाठी निवडणूक झाली होती. सुजाता सावंत या दुसर्यांदा सदस्य निवडून आल्या होत्या. दोन्ही वेळा त्या बिनविरोध निवडून आल्या. यंदा सरपंच आरक्षण ओबीसी महीला राखीव झाल्याने त्यांना संधी मिळाली. तसेच नितिन सावंत हे गेल्या दहा वर्षापुर्वी या गावचे सरपंच होते. तसेत नितिन सावंत हे कणकवली तालुका पत्रकार संघाचे विद्यमान सचिव, कनेडी शिक्षण संस्थेचे शालेय समिती सदस्य आहेत. ग्रामिण विकासाचा त्यांचा चांगला अनुभव आहे. आज झालेल्या निवडीनंतर सर्व पदाधिकारी आणि सदस्याने गावच्यावतीने अभिनंदन करण्यात आले.
