*कोंकण Express*/
*शिवसेना बांधकाम कामगार सेनेच्या जिल्हाप्रमुख पदी प्रसाद गावडे यांची नियुक्ती*
*कुडाळ मालवण मतदार संघातील असंख्य मनसैनिक लवकरच करणार शिवसेना पक्षात प्रवेश*
शिवसेना बांधकाम कामगार सेनेच्या जिल्हाप्रमुख पदी अखेर प्रसाद गावडेंची नियुक्ती करण्यात आली आहे. कामगार चळवलीतील आक्रमक व अभ्यासू युवा नेतृत्व म्हणून जिल्ह्यात शेतकरी व कामगारांच्या प्रश्नांसाठी पुढे येणारा आवाज अशी त्यांची ओळख असून मनसे कुडाळ तालुकाध्यक्ष म्हणून त्यांनी याआधी केलेल्या कामाची दखल घेत एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार व शिवसेना बांधकाम कामगार सेना महाराष्ट्र राज्य प्रमुख प्रीतम धारिया यांच्या शिफारशीने जिल्हाप्रमुख संजय आंग्रे यांनी नियुक्ती जाहीर केली आहे.यावेळी जिल्हा संघटक रुपेश पावसकर, युवासेना कणकवली विधानसभा जिल्हा प्रमुख मेहुल धुमाळे,शिवसेना प्रवक्ते श्री.मंगेश गुरव, मनसेचे माजी ठेकेदार संघटना जिल्हाप्रमुख श्री.अमोल जंगले आदी उपस्थित होते. जिल्ह्यातील शेतकरी व कामगार वर्गाची मोठी फळी संघटनेच्या माध्यमातून शिवसेनेच्या भगव्या प्रवाहात जोडण्याचा मानस प्रसाद गावडे यांनी यावेळी व्यक्त केला आहे.