*कोंकण Express*
*पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडी भाजपाच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद*
*सावंतवाडी ः प्रतिनिधी*
सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या वाढदिवसाच्या औचित्य साधून सावंतवाडी भाजपच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला उस्फुर्त प्रतिसाद लाभला. यावेळी भाजप कार्यकर्त्यांसह अनेक युवा पदाधिकाऱ्यांनी रक्तदान करत हे शिबीर यशस्वी केले. या शिबिराचे उद्घाटन विधानसभा प्रमुख तथा माजी आमदार राजन तेली यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी माजी नगराध्यक्ष संजू परब, जिल्हा सरचिटणीस महेश सारंग, जिल्हा निमंत्रित सदस्य मनोज नाईक, युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष लखमराजे भोसले, उपजिल्हा रुग्णालय प्रमुख डॉ. ज्ञानेश्वर ऐवळे, सावंतवाडी शहर मंडळ अध्यक्ष अजय गोंदावळे, आंबोली मंडल अध्यक्ष रवी मडगावकर, माजी पंचायत समिती सभापती पंकज पेडणेकर, माजी पंचायत समिती सदस्य प्रमोद गावडे, जिल्हा चिटणीस चंद्रकांत जाधव, सावंतवाडी मंडल सरचिटणीस परिक्षित मांजरेकर, विनोद सावंत, अॅड. संजू शिरोडकर, माजी नगरसेवक उदय नाईक, गुरू मठकर, संदेश टेमकर, हनुमंत पेडणेकर, हेमंत बांदेकर आदींसह भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.