*कोंकण Express*
*आम्हाला आमचा पगार आणि पी. एफ मिळवून द्या…*
*”त्या” कर्मचाऱ्यांची ठाकरे सेनेकडे मागणी; रूपेश राऊळांची घेतली भेट…*
*सावंतवाडी ः प्रतिनिधी*
तब्बल २१० हून अधिक सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील तरुण-तरुणींना अचानक ब्रेक देऊन त्यांचा तीन महीन्यांचा पगार तटविणाऱ्या संबंधित कंपनीकडून आमचा पगार आणि भविष्य निर्वाह निधी मिळवून द्या, अशी मागणी आज संबंधित कर्मचाऱ्यांनी ठाकरे शिवसेनेचे विधानसभा संपर्कप्रमुख रुपेश राऊळ यांच्याकडे केली.
दरम्यान कंपनीच्या अधिकाऱ्यांना बोलावून त्यांनी प्रत्यक्ष चर्चा केली व तात्काळ पगार भविष्य निर्वाह निधी जमा करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार २५ तारखेपर्यंत कंपनी ही रक्कम वळती करण्यासाठी नक्कीच प्रयत्न करेल, असा विश्वास कंपनीचे अधिकारी संदीप नाटलेकर यांनी व्यक्त केला.
सावंतवाडी येथे सुरू असलेल्या एका बीपीओ सेंटरच्या माध्यमातून तब्बल २१० तरुण-तरुणींना अचानक ब्रेक देण्यात आला आहे. तसेच
काही लोकांना काही कल्पना न देता कामावरून कमी करण्यात आले आहे. त्यांचे पगार तटविण्यात आले आहे. याबाबत आज संबंधित
कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी शिवसेनेचे विधानसभा संपर्कप्रमुख राऊळ यांची भेट घेतली व आपल्याला तात्काळ न्याय मिळवून द्यावा, अशी
मागणी केली. यावेळी तालुका संघटक मायकल डिसोजा, शब्बीर मणियार, सुजाता धडाम, विष्णू बांदेकर, संदेश मदुरकर, भरत पगारे, अभिषेक राऊळ, रुत्विक नाईक, राकेश निचम, शुभम कदम, प्राजक्ता परब, ऐश्वर्या सावंत, सायली कुणकेकर, जुई कानविंदे, शमिका नेमलेकर, यशश्री सापळे, प्रतिमा मोरजकर, रोहित राऊळ आदी उपस्थित होते.

