*कोंकण Express*
*रोजगार उपलब्ध करून देणार व खासदार नारायण राणे यांचे स्वप्न सत्यात उतरविणार, मंत्री दीपक केसरकर*
शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री, महाराष्ट्र राज्य मंत्री दीपक केसरकर यांनी आज आडाळी एमआयडीसी ची पाहणी केली. यावेळी काही औषधी कंपन्यांचे व्यवस्थापकीय संचालक देखील उपस्थित होते. आडाळी एमआयडीसीत रोजगार उपलब्ध करून खासदार नारायण राणे यांचे स्वप्न सत्यात उतरविणार असे देखील मंत्री केसरकर यांनी आज आडाळी येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले.
यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की, जस्तीत जस्त फार्मा कंपन्या आणण्यावर आपण भर देणार व आडाळी एमआयडीसीत वायु प्रदूषण होणार नाही याची काळजी घेत असेच प्रकल्प येथे सुरू करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी शिवसेना युवा तालुकाप्रमुख भगवान गवस, तालुका संघटक गोपाळ गवस, उपतालुका प्रमुख मायक लोबो, शहर प्रमुख योगेश महाले, विभाग प्रमुख रामदास मेस्त्री, सरपंच पराग गावकर, विठू शेटवे, गुरू सावंत, सुमीत गवस सज्जन धाऊस्कर, नंदु गावकर, दाजी गावकर, नीळकंठ गावकर प्रविण गावकर आदी उपस्थित होते.