कुंभवडेत सेनेला जोरदार धक्का :ग्रामपंचायत भाजपकडे

कुंभवडेत सेनेला जोरदार धक्का :ग्रामपंचायत भाजपकडे

*कोकण Express*

*कुंभवडेत सेनेला जोरदार धक्का :ग्रामपंचायत भाजपकडे*

*सरपंचपदी मिलिंद गुरव तर उपसरपंचपदी विनोद कदम*

*गावात भाजपा पदाधिकाऱ्यांचा जल्लोष*

वैभववाडी ः प्रतिनिधी

कुंभवडे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी भाजपाचे मिलिंद गुरव तर उपसरपंचपदी विनोद कदम यांची बिनविरोध निवड झाली आहे. या निवडणुकीत सेनेला जोरदार धक्का बसला आहे. या ग्रामपंचायतीत सेनेचे चार तर भाजपचे तीन सदस्य निवडून आले होते. सरपंच पद नामाप्र साठी राखीव झाले होते. त्यामुळे सेनेच्या गटात अस्वस्थता निर्माण झाली होती. राखीव जागेवरील सदस्य भाजपकडे असल्याने भाजपा पदाधिकाऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. त्याचबरोबर सेनेचे सदस्य विनोद कदम यांनी भाजपात प्रवेश केल्याने आता उपसरपंचपदी ही भाजपकडे राहिले आहे. त्यांच्या निवडीनंतर गावातील भाजपा पदाधिकाऱ्यांनी नुतन सरपंच मिलिंद गुरव व विनोद कदम यांचे अभिनंदन केले आहे. यावेळी भाजपा पदाधिकारी प्रमोद सावंत, उदय चव्हाण, सदस्या शिल्पा सावंत, विनया सावंत, माजी सरपंच परशुराम आमकर, रमेश मुळ्ये, चंद्रकांत तावडे, प्रतिक चव्हाण, दीपक सावंत, विजय पालांडे, संतोष जाधव, अशोक शिंगरे, संतोष तावडे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. निवडणूक निर्णय अधिकारी श्री लांबोरे यांच्या उपस्थितीत निवडणूक प्रक्रिया गावात शांततेत पार पडली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!