*कोंकण Express*
*मालवणात शिवसृष्टी उभारणार असे सांगून केसरकारांकडून जनतेची फसवणूक…*
परशुराम उपरकरांचा आरोप; सावंतवाडी मतदार संघातील सर्वच राजकीय नेते “लँडमाफिया”…
*सावंतवाडी ः प्रतिनिधी*
मालवण येथे शिवसृष्टी उभारणार असे सांगून दीपक केसरकर जिल्ह्यातील जनतेची दिशाभूल करत आहे. मंत्रीपद असताना जे रोजगार देऊ शकले नाहीत. कबुलायतदार सारखा प्रश्न सोडू शकले नाहीत ते आता काय करणार? असा सवाल आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत माजी आमदार परशुराम उपरकर यांनी उपस्थित केला. दरम्यान सावंतवाडी मतदार संघातील सर्वच राजकीय नेते “लँडमाफीया” आहेत. अनेक जण जमिनीची दलाली करतात. दोडामार्ग मधील अनेक जमीनी त्यांनी थेट केरळीयनांना विकल्या ही वस्तुस्थिती आहे, असे ते म्हणाले. श्री. उपरकर यांनी आज येथील शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद घेतली. यावेळी आशिष सुभेदार उपस्थित होते.
श्री. उपरकर पुढे म्हणाले, मंत्री केसरकर हे तीन वेळा या मतदारसंघाचे आमदार झाले तसेच प्रत्येक वेळी पक्ष बदलून ते मंत्री झाले. शिवसेनेत जाऊन त्यांनी गृहराज्य तर शिवसेनेत जाऊन शिक्षण मंत्री पद मिळवले. मात्र या मिळवलेल्या पदांचा जिल्ह्याला कोणताही फायदा झाला नाही. मात्र प्रत्येक वेळी पक्ष बदलून ते आपला स्वार्थ साधतात. दरम्यान कॅबिनेट मंत्री असूनही कबुलातदार गावकार प्रश्न अद्यापही सुटला नाही हे दुर्दैव. जिल्ह्यातील बेरोजगारांना नोकरी द्यायला जमत नाही मात्र मतदारसंघातील लोक जर्मनीत पाठवणार असल्याचे आश्वासन निवडणुकीच्या अगोदर देत आहेत. तसेच जिल्हाधिकारी स्वतः मागणी करून या जिल्ह्यात आले तेच जिल्हाधिकारी वर्षभरात आपली मागणी करून दुसऱ्या जिल्ह्यात जायला तयार होतात यामागे काय दडलय काय? या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना बदलण्याचा प्रयत्न केला. पुतळ्याचा फारच केला या जिल्ह्याचा फारच केला आणि जिल्हाधिकाऱ्यांना बदलला पुतळ्याची साईज किती असावी यासाठी समिती नेमण्यात येते मात्र केसरकर हे शंभर फुटी पुतळा उभारत आहेत तसेच शिवसृष्टी उभारणार आहेत. याबाबत तेथील मालकांना अद्याप कोण तीही कल्पना नाही. ज्याप्रमाणे मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटलची घोषणा केली तसेच शिवसृष्टीची घोषणा करून जनतेची फसवणूक करण्याचे काम करत आहेत. त्यांनी आजपर्यंत जे आश्वासन दिली ती पूर्ण केली का? हे समोर बसून सांगावे. सर्वच पक्षाचे पक्षाचे लोक लँडमाफिया आहेत. कोणी कोणावर आरोप केला तरी प्रत्येक जण वेगवेगळ्या पक्षातून जमिनीमध्ये ते सामील आहेत. ते दलाली करतात आणि परप्रांतीय लोकांना या ठिकाणी आणतात. दोडामार्ग मध्ये केरळीयन वाढले आहेत. त्याला जिल्ह्यातलेच लोक जबाबदार आहेत. सासोलीत जो प्रकार घडला त्यालाही जिल्ह्यातील लोक जबाबदार आहेत. मात्र या सर्व प्रकाराबाबत या भागाचे आमदार डोळ्यावर पट्टी बांधून बसले आहेत. हा मतदारसंघ गुन्हेगारीचा मतदारसंघ झालेला आहे.