*कोंकण Express*
*असलदे गावात दिलीप तळेकर यांचा सत्कार*
*गावच्या सर्वांगीण विकासासाठी पाठपुरावा करण्याची श्री. तळेकर यांची ग्वाही…*
*कणकवली ः प्रतिनिधी*
भाजप तालुकाध्यक्षपदी नुकतीच दिलीप तळेकर यांची नियुक्ती करण्यात आली. त्याबद्दल असलदे ग्रामस्थांच्यावतीने श्री. तळेकर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी असलदे गावच्या सर्वागिण विकासासाठी आपण आमदार नितेश राणेंच्या माध्यमातून सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही श्री. तळेकर यांनी दिली.
असलदे विविध कार्यकारी सोसायटी सभागृहात श्री. तळेकर यांचा सत्कार सोसायटी अध्यक्ष भगवान लोके आणि सरपंच चंद्रकांत डामरे यांच्याहस्ते करण्यात आला. यावेळी नांदगाव सरपंच भाई मोरजकर, उपसरपंच सचिन परब, माजी सरपंच पंढरी वायंगणकर, माजी सरपंच सुरेश लोके, सोसायटी संचालक शत्रुघ्न डामरे, उदय परब, परशूराम परब आदींसह गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.