*महाविकास आघाडीकडून उमेदवारीसाठी विलास पवार यांचे नाव आघाडीवर*

*महाविकास आघाडीकडून उमेदवारीसाठी विलास पवार यांचे नाव आघाडीवर*

*कोंकण Express*

*महाविकास आघाडीकडून उमेदवारीसाठी विलास पवार यांचे नाव आघाडीवर*

लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. त्यामुळे सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मिळालेले यश बघून महायुतीतील घटक पक्ष प्रचंड तयारीला लागलेले दिसून येत आहेत. महाविकास आघाडीची हवा आणि त्यादृष्टीने महायुतीची जोरदार तयारी यामुळे विधानसभा निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता आहे. अशात निवडून येण्याची क्षमता असणारे उमेदवार देण्याचा प्रयत्न सर्व पक्ष करीत आहेत. त्या दृष्टीने पक्षांची चाचपणी सुरू आहे.
महाविकास आघाडीच्या जागावाटपात नाशिकमधील देवळाली विधानसभा मतदार संघ राष्ट्रवादी काँग्रेस ( शरद पवार) गटास सुटण्याची शक्यता आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने उमेदवार निवडीची प्रक्रिया राबविण्यास सुरवात केली आहे.
राष्ट्रवादी काँगेस पक्षाच्या उमेदवारांकडून अपेक्षित निकष गृहीत धरता उमेदवारीसाठी देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डाचे माजी उपाध्यक्ष विलास पवार यांचे नाव प्रकर्षाने आघाडीवर येत आहे.
गेली अनेक वर्ष कॅन्टोन्मेंट बोर्डाचे नगरसेवक म्हणून निवडून येत असल्याने निवडणूक लढवण्याचा अनुभव , जिंकण्याची क्षमता त्यांची जमेची बाजू ठरत आहे. देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डाचे नगरसेवक तसेच उपाध्यक्ष असताना त्यांनी केलेली विकासकामे यामुळे देवळालीचा पालटलेला चेहरामोहरा बघता त्याच धर्तीवर ते देवळाली मतदार संघाच्या विकासाचे व्हिजन समर्थपणे राबवू शकतात अशी पक्ष नेतृत्वाची भावना दिसून येत आहे.
विलास पवार हे चळवळीतील कार्यकर्ते असल्याने तळागाळातील जनतेशी त्यांचा संपर्क आहे. त्यायोगे ग्रामीण भागातील जनतेशी असणारा अफाट जनसंपर्क तसेच देवळाली, भगुर, नाशिकरोड या शहरी भागातून मिळू शकणारी एक गठ्ठा मते यामुळे उमेदवारीसाठी विलास पवार यांचे पारडे तूर्तास जड वाटत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!