*कोकण Express*
*पणदूर-घोटगे राज्यमार्गाचे आ.वैभव नाईक यांच्या हस्ते भुमिपूजन*
*एस.आर.बजेट अंतर्गत ५ कोटी ६५ लाख रु निधी मंजूर*
*कुडाळ ः प्रतिनिधी*
कुडाळ तालुक्यातील पणदूर-घोटगे या राज्यमार्गासाठी आमदार वैभव नाईक यांच्या प्रयत्नांतून ५ कोटी ६५ लाख रु निधी मंजूर झाला आहे. एस. आर. बजेट मधून हा निधी मंजूर करण्यात आला असून या राज्यमार्गाच्या कामाचे भुमिपूजन आज कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले.
कुडाळ तालुक्यातील हा प्रमुख राज्यमार्ग नादुरुस्त झाल्याने प्रवाशी व वाहनचालकांना प्रवास करताना त्रासदायक ठरत होते. हा रस्ता नूतनीकरणासाठी ग्रामस्थांकडून मागणी होत होती. याची दखल घेउन आमदार वैभव नाईक यांनी खासदार विनायक राऊत, पालकमंत्री उदय सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ,सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे पाठपुरावा करून रस्त्यासाठी निधी मंजूर करून घेतला असून रस्ता नूतनीकरणाच्या कामास सुरुवात झाली आहे. याबद्दल ग्रामस्थांनी समाधान व्यक्त करत पुष्पगुच्छ देऊन आ. वैभव नाईक यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी आ. वैभव नाईक यांनी रस्त्याचे काम दर्जेदार करण्याच्या सूचना ठेकेदारास दिल्या. तसेच इतर रस्त्यांच्या कामांबाबत पाठपुरावा सुरु असून लवकरच कामांना सुरुवात करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी शिवसेना उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, जि. प. गटनेते नागेंद्र परब, उपसभापती जयभारत पालव, अतुल बंगे, उपतालुकाप्रमुख बाळू पालव, पावशी विभाग प्रमुख दीपक आंगणे, बाळा पवार, तानाजी पालव, मंदार कोठावळे, प्रताप साहिल, आनंद मर्गज, चेतन पालव आदीसह शिवसैनिक व ग्रामस्थ उपस्थित होते.