*कोकण Express*
*वर्षा वर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते बांधले शिवबंधन भाजपाचे ६ नगरसेवक शिवसेनेत*
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते वैभववाडी नगरपंचायत मधील भाजपाच्या ६ नगरसेवकांनी वर्षा बंगल्यावर शिवबंधन बांधले. आमदार नितेश राणेंना कंटाळून भाजपा सोडल्याचा आरोप यावेळी प्रवेशकर्त्या नगरसेवकांनी केला.
पालकमंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राणेंच्या मेडिकल कॉलेज उदघाटनावेळी शिवसेनेवर चांगलेच तोंडसुख घेतले होते. शाह यांच्या दौऱ्याला २ दिवस उलटत नाहीत तोवर शिवसेनेचा याचा वचपा काढल्याची चर्चा सिंधुदुर्गसह राज्यभर आहे. यावेळी या राजकीय भूकंपाचे निर्माते अतुल रावराणे, जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, संदेश पारकर, मंगेश लोके, प्रदीप रावराणे आदी उपस्थित होते.