*कोंकण Express*
*जनजागृती सेवा संस्थेच्यावतीने शिक्षक दिनानिमित्त कलमठ कुभांरवाडी जि.प.शाळेतील शिक्षकांचा सत्कार…!*
कणकवली-भारताचे दुसरे राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा ५सप्टेंबर हा जन्मदिवस. देशात हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो,त्याच अनुषंगाने सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणा-या’जनजागृती सेवा संस्था (रजि) या सामाजिक संस्थेने शिक्षक दिनाचे औचित्य साधून शाळा कलमठ कुभांरवाडी ता. कणकवली येथील जि.प.शाळेतील शिक्षकांचा जनजागृती सेवा संस्थेचे अध्यक्ष गुरुनाथ तिरपणकर, जेष्ठ अभिनेत्री सौ.अक्षता कांबळी (वेतोबा,गाव गाता गजाली फेम), संस्थेच्या सदस्या सौ. गंधाली तिरपणकर यांच्या शुभसस्ते शाल, श्रीफळ, गुलाब पुष्प,भेटवस्तू व सन्मानपत्र देऊन सर्व शिक्षकांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याचा गौरव करुन यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी शाळा व्यवस्थापन सदस्या सौ.नेहा वावळीये, सिध्देश कांबळी, सौ.अक्षता कांबळी उपस्थित होते. याप्रसंगी संस्थेच्यावतीने मुख्याध्यापक श्री.श्रीकांत बुचडे, शिक्षक श्री.रमेश डोईफोडे, श्री.अमित हर्णे, श्रीम.ऋतुजा जाधव, श्रीम.चित्राक्षी देसाई,श्रीम. दिशा राणे, श्रीम. अपुर्वा ठाकूर, अंगणवाडी सेविका श्रीम. दिव्या करंजेकर या शिक्षकांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.अध्यक्ष गुरुनाथ तिरपणकर यांनी शिक्षकांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. तसेच अभिनेत्री व समाजसेविका सौ.अक्षता कांबळी यांनीही शिक्षकांच्या कार्याबद्दल व संस्थेच्या कार्याविषयी गौरवोद्गार काढले. मुख्याध्यापक श्री.बुचडे यांनी मान्यवरांचे तसेच संस्थेचे आभार मानले.

