*कोंकण Express*
*फोंडाघाट विकास सेवा सोसायटी शासनाचे रेशन धान्य दुकानामध्ये गणेश चतुर्थी निमित्त आनंदाचा शिधा वाटप*
*फोंडाघाट ः संजना हळदिवे*
आज दिनांक 05/09/2024 रोजी महाराष्ट्र राज्य शासनाने गणेश चतुर्थी निमित्त आनंदाचा शिधा वाटपफोंडाघाट विकास सेवा सोसायटी च्या शासनाच्या रेशन धान्य दुकान मध्ये वाटप करताना
मा.सौ.संजना संजय आग्रे सरपंच ग्रामपंचायत फोंडाघाट,मा.सौ.श्रध्दा दिलिप सावंत उपसभापती कृषी उत्पन्न बाजार समिती सिंधुदुर्ग, श्री.राजन नानचे चेअरमन फोंडाघाट विकास सेवा सोसायटी,धृवबाळ गोसावी सोसायटी संचालक, विठ्ठल लाड ग्रा.पंचायत सदस्य, श्री. एस. बी. सावंत तलाठी फोंडाघाट, प्रसाद देसाई सचिव फोंडाघाट सोसायटी, दुकान नंबर 1,2,3, चे सेल्समन सरीता पाटकर नाईक, श्री. अशोक तावडे,सौ.आर्या नानचे आणि रेशन धान्य दुकान फोंडाघाट चे ग्राहक या वेळी उपस्थित होते. या निमित्ताने बोलताना सरपंच सौ.आग्रे मॅडम यांनी महाराष्ट्र राज्य शासनाने गणेश चतुर्थी निमित्त आनंदाचा शिधा वाटप केले बद्दल माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री श्री. अजितदादा पवार साहेब यांचे आभार व्यक्त करून फोंडाघाट मधील जनतेला गणेश चतुर्थी सण उत्साहात साजरा करण्यासाठी शुभेच्छा दिल्या.

