*कोकण Express*
*व्यापारी संघटनेच्या कार्यकारणीवर झालेली निवड हा त्या पदाचा बहुमान ; प्रसाद अंधारी*
*महापुरुष मंडळाच्यावतीने राजन पारकर व विलास कोरगावकर यांचा सत्कार….!*
*कणकवली ः प्रतिनिधी*
व्यापार ही कला आहे. या कलेच्या माध्यमातून ग्राहकाला सेवा देताना अंगी असलेला नम्रपणा जी व्यक्ती टिकवून ठेवते तीच व्यक्ती या व्यापारी केलेत पारंगत होते.अशीच कला कणकवली शहरातील व्यापारी राजन पारकर व विलास कोरगावकर यांनी जोपासली आहे. म्हणूनच व्यापाऱ्यांचे प्रश्न व समस्या सोडवण्यासाठी त्यांची व्यापारी संघटनेच्या कार्यकारणीवर झालेली निवड हा त्या पदाचा बहुमान असल्याचे गौरउद्गार मंडळाचे अध्यक्ष प्रसाद अंधारी यांनी व्यक्त केले.
शहरातील सामजिक क्षेत्रातील तसेच महापुरुष मित्रमंडळाचे उपाध्यक्ष राजन पारकर यांची तालुका व्यापारी संघटनेच्या उपाध्यक्षपदी तर मंडळाचे सदस्य विलास कोरगावकर यांची सचिवपदी निवड झाल्याबद्दल महापुरुष मंडळाच्यावतीने सत्कार करण्यात आला.
शहरातील प्रतिष्टीत व्यापारी निवृत्ती धडाम जेष्ठ नागरिक राजन ओटवकर व प्रकाश घेवारी यांच्या हस्ते शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला.
यावेळी मंडळाचे अध्यक्ष प्रसाद अंधारी,जेष्ठ व्यापारी विजय उर्फ बापू पारकर,शेखर ओरसकर,भरत तोरस्कर,सूर्यकांत कुवळेकर,राजू मानकर,आनंद पोरे,अमित सापळे,प्रशांत सटविलकर,सुशील पारकर,बंडू राणे,उदय मुंज,चेतन अंधारी,महेश मुंज,संदीप अंधारी,प्रथमेश चव्हाण,निखिल घेवारी,सोहम वाळके,प्रद्युम मुंज,प्रज्वल वर्दम,दत्ता तोरस्कर,अजित बीडये,सोमनाथ पारकर,हर्षल अंधारी आदी व्यापारी,कार्यकर्ते उपस्थित होते.
व्यापारी संघटनेने दिलेल्या संधीचे सोने करत येणाऱ्या काळात व्यापारी क्षेत्रातील समस्या सोडवण्यासाठी प्रमाणिक प्रयत्न करणार आहे.तसेच आपल्या कुटुंबाने केलेल्या सत्काराबद्दल आभार व्यक्त केले.