*कोंकण Express*
*जिल्हास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत कनेडी हायस्कूलची चमक*
*कुणाल नारकर याची विभागीय स्तरावर निवड*
*जिल्हास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धा सन २०२४ नुकतीच जिल्हा क्रीडा संकुल, सिंधुदुर्गनगरी येथे संपन्न झाली. या स्पर्धेमध्ये कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ, मुंबई संचलित माध्यमिक विद्यामंदिर कनेडी, श्री. मोहनराव मुरारीराव सावंत ज्युनि. काॅलेज ऑफ आर्ट्स ॲण्ड काॅमर्स, श्री. तुकाराम शिवराम सावंत ज्युनि. कॉलेज ऑफ सायन्स आणि बालमंदिर कनेडी या प्रशालेतील कुणाल निलेश नारकर ( इ. १२वी विज्ञान) या विद्यार्थ्याने १९ वर्षांखालील गटात उत्कृष्ट बॅडमिंटन कौशल्य दाखवून सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या संघात आपले नाव निश्चित केले आहे. त्याने वैयक्तिक गटात ५६ प्रतिस्पर्ध्यांमध्ये उत्कृष्ट चढाई व बचाव यांचा सुरेख संगम साधत जिल्ह्यामध्ये प्रथम क्रमांक प्राप्त केला. सदर स्पर्धेमध्ये जिल्ह्यातील एकूण ३०० पेक्षा जास्त बॅडमिंटन खेळाडूंनी सहभाग घेतला होता. कुणाल नारकर याची सातारा येथे होणाऱ्या विभागीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेसाठी निवड झाली आहे. सांघिक गटामध्ये सुद्धा कनेडी हायस्कूलच्या मुले व मुली यांनी उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली होती.*
*कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ मुंबईचे अध्यक्ष सन्मा. श्री. सतीशजी सावंत व सर्व पदाधिकारी, शालेय समिती चेअरमन सन्मा. श्री. आर्. एच्. सावंत व सर्व सदस्य, प्रशाला मुख्याध्यापक तथा प्राचार्य सन्मा. श्री. सुमंत दळवी, पर्यवेक्षक श्री. बयाजी बुराण, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी अभिनंदन केले व विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.*
*सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना प्रशालेचे संस्कृत तथा इंग्रजी अध्यापक व उत्कृष्ट बॅडमिंटन खेळाडू श्री. मकरंद आपटे व क्रीडा शिक्षक श्री. बयाजी बुराण यांचे मार्गदर्शन लाभले.*

