*कोंकण Express*
*कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघाच्या सावंतवाडी शहर अध्यक्षपदी शैलेश गवंडळकर यांची निवड*
कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघाचे अध्यक्ष प्रणव (दादा) पेणकर, उपाध्यक्ष जितेंद्र पवार, कार्याध्यक्ष संतोष नाईक, सहसचिव सुधीर पराडकर यांनी सावंतवाडी शहर अध्यक्ष निवड जाहीर केली.
संघटनेच्या वतीने सावंतवाडी शहर अध्यक्ष निवड झाल्याचे नियुक्तीपत्र देतेवेळी कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघाचे कोकण विभागीय कार्याध्यक्ष संतोष नाईक व सह सेक्रेटरी सुधीर पराडकर.
त्यावेळी उपस्थित कुडाळ तालुकाध्यक्ष रवी माने, सावंतवाडी तालुकाध्यक्ष धर्मेंद्र सावंत व रिक्षाचालक मालक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. शैलेश गवंडळकर यांची शहर अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सावंतवाडी शहरातील सर्व रिक्षा चालक मालक यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

