माजी आ. परशुराम उपरकर यांच्या विरुद्ध कायदेशीर गुन्हा नोंद करण्यासाठी परवानगी द्यावी…

माजी आ. परशुराम उपरकर यांच्या विरुद्ध कायदेशीर गुन्हा नोंद करण्यासाठी परवानगी द्यावी…

*कोंकण Express*

*माजी आ. परशुराम उपरकर यांच्या विरुद्ध कायदेशीर गुन्हा नोंद करण्यासाठी परवानगी द्यावी…*

*बांधकामचे कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांची अधीक्षक अभियंत्यांकडे मागणी*

*कणकवली ः प्रतिनिधी*

वारंवार सार्वजनिक बांधकाम विभागाची गेली वर्षभर आणि दि. ४ डिसेंबर २०२३ रोजी सिंधुदुर्ग जिल्हयातील मालवण येथे झालेल्या नौसेना दिनाच्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने तयार करण्यात आलेल्या हॅलीपेंडच्या बांधकामाबाबत तक्रार करणारे माजी आमदार परशुराम उपरकर यांच्या विरुद्ध कायदेशीर गुन्हा नोंद करण्यासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी बांधकामचे कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांनी रत्नागिरी अधीक्षक अभियंत्यांकडे पत्राद्वारे केली आहे.

०४ डिसेंबर २०२३ रोजी नौसेना दिन सिंधुदुर्ग जिल्हयातील मालवण येथील समुद्र किनारी आयोजित करण्यात आला होता. सदरील कार्यक्रमासाठी पंतप्रधान, संरक्षण मंत्री, केंद्रिय मंत्री भारत सरकार, राज्यपाल महोदय, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व मंत्रीमंडळातील अन्य मंत्रीगण, महाराष्ट्र राज्य अशी अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होते. यानिमीत्ताने मालवण येथे विविध ठिकाणी एकूण ११ हॅलीपेंड उभारण्यात आली होती. त्याचा सविस्तर तपशील आहे. त्यामध्ये १) बोडींग ग्राऊंड मैदानावर ३ डांबरी पृष्ठवभागाची. २) कुंभारमाठ येथे शासकिय तंत्रनिकेतन नजीक ३ काँक्रीट पृष्ठभागची व २ डांबरी पृष्ठभागाची. ३) ओझर येथे ३ डांबरी पृष्ठभागाची ही सर्व हॅलीपॅड अतिमहनीय व्यक्तींच्या आगमन निर्गमनासाठी पक्क्या स्वरुपाची (पृष्ठभागाची) तत्कालीन वरीष्ठ अधिकारी, पंतप्रधान यांचे सुरक्षा रक्षक, जिल्हाधिकारी तसेच जिल्हा पोलीस यांनी दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करण्यात आले आहे. यासाठी सक्षम स्तरावरुन मान्यता प्राप्त करुन घेण्याची कार्यवाही सुदधा प्रचलीत शासकिय धोरणानुसार करण्यात आली आहे. तथापी कणकवली येथील श्री. परशुराम उपरकर, माजी विधानसभा सदस्य हे सातत्याने सार्वजनीक बांधकाम विभाग व व्यक्तीशः माझ्याबददल चुकीची व गैरसमज करुन देणारी माहिती प्रसार माध्यमांद्वारे गेली वर्षभर पसरवीत आहेत, मागील सुमारे वर्षभरापासून त्यांचे या कार्यालयास सुमारे ६० हुन अधिक माहिती अधिकार अधिनियम सन २००५ अन्वये माहिती मागणेसाठी अर्ज प्राप्त झाले आहेत. विशेष म्हणजे ज्या अर्जावर अगोदर माहिती देण्यात आली आहे. त्याविषयाबाबत पुन्हा माहिती मागण्याचे अर्जही यामध्ये आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!