*कोंकण Express*
*सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नवीन जिल्हाधिकारी म्हणून अनिल पाटील यांची नियुक्ती*
*जिल्हाधिकारी किशोर तावडे यांची बदली*
*सिंधुदुर्ग*
सिंधुदुर्ग चे जिल्हाधिकारी किशोर तावडे यांची महाराष्ट्र राज्य फार्मिंग कार्पोरेशन पुणेच्या व्यवस्थापकीय संचालक पदी बदली झाली असून, हाफकिन चे व्यवस्थापकीय संचालक अनिल पाटील यांची सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. किशोर तावडे यांनी 23 ऑगस्ट 2023 रोजी सिंधुदुर्ग जिल्हा जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारला होता. त्यांच्या कार्यकाळात भारतीय नौसेना दिन मालवण मध्ये साजरा करण्यात आला होता. त्याचवेळी राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बांधण्यात आला होता. परंतु छत्रपतींचा शिवाजी महाराज यांचा पुतळा काही महिन्यातच काही कारणास्तव कोसळला . या सर्व गोष्टीचा वाद अजूनही महाराष्ट्रात सुरू आहे हा वाद अजून थंड झालेला नसताना विरोधकांनी केंद्र सरकारला चांगलेच कोंडीत पकडले आहे. त्याचबरोबर पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी जिल्हाधिकारी तावडे यांच्या समोरच मीडियासमोर नाराजी व्यक्त केली होती . या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी तावडे यांची झालेली तडका फडकी बदली हा चर्चेचा विषय बनला आहे.