कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघाच्या वतीने जिल्हाधिकारी तथा प्रादेशिक परिवहन प्राधिकरण ( *RAT* )सिंधुदुर्ग यांना प्रलंबित मागण्यांचे दिले निवेदन

कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघाच्या वतीने जिल्हाधिकारी तथा प्रादेशिक परिवहन प्राधिकरण ( *RAT* )सिंधुदुर्ग यांना प्रलंबित मागण्यांचे दिले निवेदन

*कोंकण Express*

*कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघाच्या वतीने जिल्हाधिकारी तथा प्रादेशिक परिवहन प्राधिकरण ( *RAT* )सिंधुदुर्ग यांना प्रलंबित मागण्यांचे दिले निवेदन*

*कणकवली ः प्रतिनिधी*

कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघाच्या वतीने जिल्हाधिकारी तथा प्रादेशिक परिवहन प्राधिकरण ( *RAT* )सिंधुदुर्ग यांना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रिक्षा चालक मालकांच्या प्रलंबित मागण्यांची प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाच्या ( *RTA* ) बैठकीत पूर्तता करण्यासाठी निवेदन देण्यात आले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पंधरा वर्षे पूर्ण झालेल्या लेट पासिंगच्या नावाखाली प्रतिदिन पन्नास रुपये दंड आकारण्यात येतो. महाराष्ट्र शासनाने मुंबई पुणे व महानगरपालिका क्षेत्रातील पंधरा वर्षाखालील सर्व रिक्षांना प्रतिदिन पन्नास रुपये आकारलेला दंड माफ केलेला आहे. महानगरपालिका क्षेत्रामध्ये पंधरा वर्षाच्या पुढे रिक्षा स्क्रॅप केला जातात. परंतु कोकण विभागा मध्ये रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर या जिल्ह्यामध्ये पंधरा वर्षानंतर रिक्षा पासिंग साठी शासनाची वाढीव फी भरून रिक्षा पासिंग केल्या जातात. त्यामुळे जर पासिंग केल्या जातात तर त्यांना सुद्धा विलंब दंड प्रतिदिन पन्नास रुपये माफ करावा .
तसेच एखाद्या रिक्षा चालकाचा अपघाती किंवा आजारपणामुळे दुःखद निधन झालेले असेल, तर त्याच्या विधवा पत्नीला कोर्टाचे सक्सेशन सर्टिफिकेटची सक्ती केली जाते. ती रद्द करून पूर्वी प्रमाणे पेपरमध्ये जाहिरात व शंभर रुपयांच्या बॉण्ड पेपर वर शपथपत्र घेऊन मयत रिक्षाचालकाच्या नावे असलेली रिक्षा आरटीओ कार्यालयामार्फत त्याच्या विधवा पत्नीच्या नावे करून देण्यात यावी.
सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यात स्क्रॅप मर्चंट आहेत. यापूर्वी रिक्षाचालक त्या स्क्रॅप मर्चंट कडे रिक्षा देऊन संबंधित आरटीओ अधिकाऱ्यांच्या समोर ती रिक्षा तोडली जात असे. अधिकारी त्याचे व्हिडिओ शूटिंग करून किंवा फोटो काढून ते आरटीओ कार्यालयात दाखल केले जात होते, परंतु आत्ता आरटीओ कार्यालय या ठिकाणी स्क्रॅप रिक्षा आणून तोडण्याची सक्ती केली जाते. ती सक्ती रद्द करण्यात यावी. जर रिक्षा चालकांना हा नियम असेल तर स्क्रॅप साठी येणारी अन्य वाहने एस टी, जड वाहने, डंपर, हे सुद्धा आरटीओ ऑफिस या ठिकाणी तोडण्यात यावीत. फक्त रिक्षा चालकांवर आरटीओ ऑफिस येथे आणून रिक्षा तोडण्याची सक्ती नको.
आरटीओ ऑफिसला रिक्षा पासिंग साठी आल्यानंतर रिक्षा चालकांना दुपारपर्यंत थांबून ठेवले जाते. रिक्षाचालक देवगड, कुणकेश्वर, खारेपाटण, दोडामार्ग, वैभववाडी, विजयदुर्ग या ठिकाणाहून रिक्षा चालक-मालक आरटीओ ऑफिसला रिक्षा पासिंग साठी येत असतात. तेव्हा त्यांच्या रिक्षा लवकरात लवकर पासिंग करून देण्यात यावी.
वरील रिक्षाचालक मालक यांच्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी सिंधुदुर्ग, पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग यांना देण्यात आले.
निवेदन देतेवेळी उपस्थित कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघाचे कार्याध्यक्ष संतोष नाईक, सहसचिव सुधीर पराडकर, कुडाळ तालुकाध्यक्ष रवी माने, मालवण तालुकाध्यक्ष संदीप सावंत उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!