विलवडे वन्यप्राण्यांकडून झालेल्या नुकसानीची भरपाई द्या मनसेची वनविभागाकडे मागणी

विलवडे वन्यप्राण्यांकडून झालेल्या नुकसानीची भरपाई द्या मनसेची वनविभागाकडे मागणी

*कोकण Express*

*विलवडे वन्यप्राण्यांकडून झालेल्या नुकसानीची भरपाई द्या मनसेची वनविभागाकडे मागणी*

*शेतकऱ्यांना विमा संरक्षण मिळवून देण्यासाठी प्रयत्न करा जिल्हाध्यक्ष धीरज परब यांची उपवनसंरक्षक श्री शहाजी नारनवर यांच्याकडे मागणी*

*सावंतवाडी ः प्रतिनिधी*

विलवडे येथे वन्यप्राण्यांकडून झालेल्या नुकसानीची भरपाई शेतकऱ्यांना तात्काळ शासनाकडून मिळवून देण्यात यावी अशी मागणी आज मनसेच्या वतीने जिल्हाध्यक्ष धीरज परब यांच्या नेतृत्वाखाली वनविभागाकडे करण्यात आली दरम्यान भविष्यातील नुकसानी टाळण्यासाठी ेतकर्‍यांना शेत कुंपण अनुदान देण्यात यावे तसेच विमा कंपनीचे सहाय्य घेऊन त्यांना विमा संरक्षण मिळवून देणाऱ्या वे अशी मागणी यावेळी मनसेच्या वतीने करण्यात आली मनसेच्या पदाधिकाऱ्यांना उपवनसंरक्षक शहाजी नारनवर यांनी आपल्या मागण्या आम्ही महाराष्ट्र शासनाच्या दरबारी नक्कीच पोचू असे आश्वासन दिले तसेच चर्चेत झालेल्या विषयी योग्य ते उपाय योजना राबून शेतकऱ्यांना सहकार्य केले जाईल असे आश्वासनही श्री नारनवर यांनी दिले यावेळी मनसेचे सावंतवाडी तालुकाअध्यक्ष गुरुदास गवंडे, ॲड. अनिल केसरकर माजी जिल्हाध्यक्ष, विठ्ठल गावडे तालुका सचिव, अॅड. राजू कासकर परिवहन जिल्हाध्यक्ष, संतोष भैरवकर परिवहन कार्याध्यक्ष, सुधीर राऊळ तालुका उपाध्यक्ष तळवडे, प्रकाश साटेलकर तालुका उपाध्यक्ष मळेवाड, श्रीराम सावंत शाखाध्यक्ष विलवडे, निलेश मुळीक शाखाध्यक्ष धाकोरे, संतोष सावंत शाखाध्यक्ष वेलेंआदी पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!