*कोंकण Express*
*ठाकरे शिवसेना नेते संजय राऊत सिंधुदुर्गात दाखल*
*कणकवली ः प्रतिनिधी*
सिंधुदुर्ग जिल्ह्यात राजकोट येथील पुतळ्याची पाहणी दौऱ्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते, खा. संजय राऊत सिंधुदुर्गात दाखल झाले आहेत. मोपा या विमानतळावर जिल्हाप्रमुख संदेश पारकर, जिल्हाप्रमुख संजय पडते यांनी स्वागत केले.
यावेळी युवासेना मंदार शिरसाठ, चंद्रहार पाटील सांगली, पराग म्हापसेकर, कृष्णा केणी आदी उपस्थित होते.