*कोकण Express*
*प्रत्येक शहरामध्ये ग्राहक सेवा केंद्र उभारण्याचा मानस ; प्रकाश चौधरी*
*कणकवलीत स्टेटबँक ग्राहक सेवा केंद्राचा शुभारंभ… !*
*ग्राहकांचा प्रतिसाद ; कमी वेळेत मिळणार दर्जेदार सेवा.. !
*कणकवली ः प्रतिनिधी*
शहरात स्टेट बँकेच्या माध्यमातून ग्राहकांना कमीत कमी वेळात उत्तम सेवा मिळावी.यासाठी ग्राहक सेवा केंद्राची दुसरी शाखा कणकवलीत सुरु करण्यात आली आहे.स्टेटबँकेत रोजची होणारी ग्राहकांची गर्दी आणि अल्प प्रमाणात असणारा कर्मचारी स्टाफ यामुळे ग्राहकांना त्रास होत होता. स्टेट बँकेच्या माध्यमातून कस्टमर सर्व्हिस पॉईंट उघडण्यात आला असून प्रत्येक शहरामध्ये असे केंद्र उभारण्याचा मानस असल्याचे स्टेट बँक शाखा अधिकारी प्रकाश चौधरी यांनी सांगितले.
स्टेटबँक ग्राहक सेवा केंद्राचा शुभारंभ स्टेट बँक शाखा अधिकारी प्रकाश चौधरी यांच्या हस्ते फित कापून करण्यात आला.यावेळी बँकेचे रवींद्र परब,व्यापारी संघटनेचे तालुका अध्यक्ष दीपक बेलवलकर,उमेश वाळके,माधव शिरसाठ,प्रसन्ना देसाई,श्री.कोदे आदी उपस्थित होते. श्री. परब म्हणाले,कणकवली स्टेट बँक शाखेतून जी सेवा ग्राहकांना दिली जाते तीच सेवा या केंद्रातून विनामूल्य मिळणार आहे.मात्र तो कणकवली शाखेचा ग्राहक पाहिजे.अन्यथा काही शुल्क भरून इतर शाखेतील ग्राहकांना सेवा दिली जाईल.रोजच्या गर्दीमुळे ग्राहक या बँकेपासून दूर जात होता.आता व्यापारी वर्गालाही रोजच्या कामासाठी हे सेवा केंद्र उपयुक्त ठरणार असल्याचे सांगत या केंद्रातून फायदा घेण्याचे आवाहन त्यांनी केले. या ग्राहक सेवा केंद्राची माहिती देताना श्री.राजाध्यक्ष म्हणाले, कणकवली स्टेट बँक शेजारी हे सेवा केंद्र असून ग्राहकांना दर्जेदार सेवा देणार असून यामधून मनी ट्रान्सफर,ए.टी.एम.काढणे,आधार कार्ड व्दारे पैसे काढणे,जन-धन खाते ओपनिंग,कर्ज हाप्ते भरणा अशा आदी सुवीधा वर्षभर सुट्टीत ही मिळणार आहेत. यासेवेमुळे ग्राहकांना होणार त्रास टळणार असल्याचे त्यांनी सांगितले.