*कोंकण Express*
*माध्यमिक विद्यामंदिर कनेडी प्रशालेत राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा*
*कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई संचलित माध्यमिक विद्यामंदिर कनेडी, श्री. मोहनराव मुरारीराव सावंत ज्युनि. कॉलेज ऑफ आर्ट्स ॲण्ड काॅमर्स कनेडी, श्री. तुकाराम शिवराम सावंत ज्युनि. कॉलेज ऑफ सायन्स कनेडी आणि बालमंदिर कनेडी येथे वार- गुरुवार, दिनांक- २९ ऑगस्ट २०२४ रोजी, प्रशालेत राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करण्यात आला.*
*विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षणा सोबत क्रीडा गुण देखील विकसित होणे गरजेचे आहे. दरवर्षी २९ ऑगस्ट हा क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी महान खेळाडू ध्यानचंद यांचा जन्म झाला होता. मेजर ध्यानचंद यांना हॉकीचा जादूगार म्हटले जाते. त्यांच्या जन्म दिना निमित्त विद्यार्थ्यांना खेळाची प्रेरणा मिळाली या उद्देशाने राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा केला जातो. या प्रसंगी इयत्ता दहावीतील विद्यार्थ्यांनी कु. मैत्रेयी मकरंद आपटे हिने मेजर ध्यानचंद यांच्या जीवनपट व क्रीडा विषयक माहिती प्रकट केली.*
*या कार्यक्रमासाठी प्रशालेचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य श्री. सुमंत दळवी, प्रशालेचे पर्यवेक्षक, क्रीडा शिक्षक श्री.बयाजी बुराण, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.*
*कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार श्री. बयाजी बुराण यांनी केले.*