*कोंकण Express*
*स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे यांच्या पुण्यतिथी निमित्त आयोजित रक्तदान शिबिराला नागरिकांचा उस्फूर्त प्रतिसाद………*
*शिवसेना शाखा देवबाग,शिवसेना तालुका समन्वयक तथा देवबाग सरपंच श्री.उल्हास तांडेल,युवासेना तालुकाप्रमुख श्री.अभिषेक कांदळगावकर यांच्या संकल्पनेतून शिवसेना जिल्हा संघटक श्री.रुपेश पावसकर,शिवसेना जिल्हा समन्वयक ऍड.श्री.यशवर्धन राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या पुण्यतिथी निमित्त आयोजित रक्तदान शिबिराला नागरिकांचा उस्फूर्त प्रतिसाद………*
शिवसेना शाखा देवबाग,शिवसेना तालुका समन्वयक तथा देवबाग सरपंच श्री.उल्हास तांडेल,युवासेना तालुकाप्रमुख श्री.अभिषेक कांदळगावकर यांच्या संकल्पनेतून शिवसेना जिल्हा संघटक श्री.रुपेश पावसकर,शिवसेना जिल्हा समन्वयक ऍड.श्री.यशवर्धन राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या पुण्यतिथी निमित्त रक्तदान शिबिर संपन्न झाले.यावेळी बोलताना शिवसेना जिल्हा संघटक श्री.रुपेश पावसकर यांनी बोलताना आपल्या भाषणात ही आपली जन्मभूमी आहे.या जन्मभूमीत आपल्याला या गावात विविध कार्यक्रम राबविण्याचा योग येतो आणि सर्वात महत्वाचे म्हणजे या गावात स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या पुण्यतिथी निमित्त आज जो रक्तदान शिबिराचा योग आला त्याबद्दल त्यांनी आयोजक मंडळाचे आभार व्यक्त केले.यावेळी धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या प्रतिमेचे पूजन शिवसेना जिल्हा संघटक श्री.रुपेश पावसकर,शिवसेना जिल्हा समन्वयक श्री. ऍड.यशवर्धन राणे,शिवसेना तालुका समन्वयक तथा देवबाग सरपंच श्री.उल्हास तांडेल, युवासेना तालुकाप्रमुख श्री.अभिषेक कांदळगावकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी युवासेना विभागप्रमुख श्री.सुयोग तांडेल यांनी विशेष मेहनत घेतली
गोकुळ अष्टमीचा उपवास व मुसळधार पाऊस असताना पण नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला,या रक्तदान शिबिरात 32 जणांनी रक्तदान केले.या कार्यक्रमाला युवासेना जिल्हा प्रमुख श्री.ऋत्विक सामंत,
युवती सेना जिल्हा प्रमुख सौ.सोनाली पाटकर यांनी भेट दिली.यावेळी मालवण तालुक्यातील पदाधिकारी कार्यकर्ते यांनी आपली उपस्थिती दर्शवून विशेष साहाय्य केले.त्याबद्द्ल आयोजकांनी आभार व्यक्त केले.