*कोंकण Express*
*_जिल्हास्तरीय जलतरणमध्ये भोसले स्कूलच्या सोहम घोगळेचे यश…._*
_जिल्हा क्रीडा संकुल, ओरोस येथे आयोजित जिल्हास्तरीय शालेय जलतरण स्पर्धेत येथील यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलचा विद्यार्थी सोहम मंगेश घोगळे याने 100 मीटर बटरफ्लाय मध्ये प्रथम आणि 50 मीटर बटरफ्लाय व 400 मीटर फ्री स्टाईल मध्ये द्वितीय स्थान मिळवत उत्कृष्ट कामगिरी केली._
_सोहमच्या दमदार कामगिरीमुळे त्याची विभागीय फेरीसाठी निवड झाली असून त्याबद्दल शाळेचे कार्याध्यक्ष अच्युत सावंतभोसले, अध्यक्षा अस्मिता सावंतभोसले, सचिव संजीव देसाई व मुख्याध्यापिका प्रियंका देसाई यांनी त्याचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या._