नगरपंचायत निवडणूकीच्या तोंडावर एकाच वेळी ७ नगरसेवकांनी दिला भाजपच्या पक्षसदस्यत्वाचा राजीनामा

नगरपंचायत निवडणूकीच्या तोंडावर एकाच वेळी ७ नगरसेवकांनी दिला भाजपच्या पक्षसदस्यत्वाचा राजीनामा

*कोकण Express*

*नगरपंचायत निवडणूकीच्या तोंडावर एकाच वेळी ७ नगरसेवकांनी दिला भाजपच्या पक्षसदस्यत्वाचा राजीनामा*

▪️ वैभवावाडीत भाजपाला खिंडार*

▪️ भाजपाला रामराम करत बांधणार शिवबंधन

*वैभववाडी * प्रतिनिधी*

वाभवे वैभववाडी नगरपंचायतीच्या ७ विदयमान नगरसेवकांसह तीन प्रमुख कार्यकर्त्यांनी आपल्या पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा भाजपा तालुकाध्यक्ष यांच्याकडे दिला आहे.त्यामुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.नगरपंचायत निवडणूकीच्या तोंडावर एकाच वेळी ७ नगरसेवकांनी पक्षाचा राजीनामा दिल्यामुळे भाजपला मोठा धक्का मानला जात आहे.हे सर्व नगरसेवक हातात शिवबंधन बांधणार असल्याचे विश्वसनीय वृत्त असून त्याला तालुकाप्रमुख मंगेश लोके यांनीही दुजोरा दिला आहे.
वाभवे वैभववाडी नगरपंचायत निवडणूक तोंडावर आली आहे.अशा वेळी एकाच वेळी ७ नगरसेवकांनी राजीनामा दिल्यामुळे वैभववाडीत मोठा राजकीय भूकंप झाल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.यामध्ये वाभवे वैभववाडीचे पहिले नगराध्यक्ष रविंद्र रावराणे,माजी नगराध्यक्ष संजय चव्हाण, संपदा राणे, दीपा गजोबार या चार माजी नगराध्यक्ष व विदयमान नगरसेवकांसह नगरसेवक संतोष पवार, रविंद्र तांबे, स्वप्निल इस्वलकर, हे तीन नगरसेवक तसेच भाजप वैभववाडी बुथप्रमुख संतोष निकम, शिवाजी राणे, दीपक गजोबार अशा एकूण १० जणांनी एकञितपणे पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.
वाभवे वैभववाडी नगरपंचायत निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर नगरसेवकांनी राजीनामा दिल्यामुळे भाजपला मोठा धक्का बसला आहे.
वाभवे वैभववाडी नगरपंचायतीवर भाजपची एकहात्ती सत्ता होती.माञ गेल्या काही दिवसापासून या नगरसेवकांमध्ये पक्षांतर्गत धुसपूस सुरु होती.त्याचा स्फोट होऊन नगरसेवक पक्षातून बाहेर पडले आहेत.याबाबत विश्वसनीय सूञांकडून मिळालेल्या माहीतीनुसार मंगळवारी हे सर्व नगरसेवक मुंबई येथे शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.या वृत्ताला शिवसेना तालुकाप्रमुख मंगेश लोके यांनी दुजोरा दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!