राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमेचे विटंबना शासन निर्मित…

राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमेचे विटंबना शासन निर्मित…

*कोंकण Express*

*हिंदूंचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेची विटंबना ही शासन निर्मितीतच…*

या दुर्घटनेत शिवरायांच्या अवमानास जबाबदार असणाऱ्या महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. रवींद्र चव्हाण व ईतर अधिकाऱ्यांवर पोलीस फौजदारी कारवाई करावी.

काही महिन्यांपूर्वी नेव्ही डे च्या निमित्ताने दि.०४ डिसेंबर २०२३ रोजी सर्जेकोट, तालुका मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण देशाचे पंतप्रधान मा. श्री. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. शिवरायांचे स्मारक उभारताना ज्या प्रतीकात्मक उपाययोजना करण्याची आवश्यकता होती, त्याकडे पूर्ण डोळे झाक करून पंतप्रधान मा. श्री. नरेंद्र मोदी यांच्या समोर स्वतःचा टेंबा मिरविण्यासाठी ज्या घाई गडबडीने निकृष्ट दर्जाचे काम करून शिवरायांचा पुतळा उभा केला गेला.

करोडो – करोडो रुपयांची उधळपट्टी शिवरायांच्या नावावर करून ज्यांनी स्वतःची तुंबडी भरली आणि आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची जी दुरावस्था झाली त्याला सर्वस्वी जबाबदार महाराष्ट्र राज्याचे भ्रष्टाचारी सार्वजनिक बांधकाम खाते तसेच सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याविरुद्ध पोलीस फौजदारी कारवाई करणे आवश्यक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्ळ्याच्या अवमानाची जबाबदारी स्वीकारून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. रविंद्र चव्हाण यांनी ताबडतोब राजीनामा द्यावा.

मा. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांना विनंती करण्यात येते की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा अवमान निसर्ग निर्मित किंवा इतर कोणत्याही कारणाने झालेला नसून तो महाराष्ट्र शासन निर्मितीतच आहे.

सबब सर्व संबंधित अधिकाऱ्यांबरोबरच सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. रविंद्र चव्हाण यांच्यावर पोलीस कारवाई करा आणि जेष्ठ तज्ञ मंडळींची समिती तयार करून या घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश आपण केंद्रीय गृहमंत्री यांना द्यावेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!